हात गमावलेल्या मजुरासाठी सरसावले शेजारी

By admin | Published: November 14, 2015 12:09 AM2015-11-14T00:09:40+5:302015-11-14T00:09:40+5:30

जळगाव- सोयाबीनची काढणी करताना मळणी यंत्रात हात अडकल्याने गंभीर दुखापत झालेल्या आसोदा रोड भागातील नंदलाल पाटील यांच्यासाठी त्यांचे शेजारी, मित्र, सोबत काम करणारी मंडळी सरसावली. त्यांनी पाटील यांना आठ हजार रुपये मदत केेली.

Neighbors have come to the rescue of lost hands | हात गमावलेल्या मजुरासाठी सरसावले शेजारी

हात गमावलेल्या मजुरासाठी सरसावले शेजारी

Next
गाव- सोयाबीनची काढणी करताना मळणी यंत्रात हात अडकल्याने गंभीर दुखापत झालेल्या आसोदा रोड भागातील नंदलाल पाटील यांच्यासाठी त्यांचे शेजारी, मित्र, सोबत काम करणारी मंडळी सरसावली. त्यांनी पाटील यांना आठ हजार रुपये मदत केेली.
पाटील हे आसोदा शिवारात सोयाबीनच्या काढणीसाठी गेले होते. या दरम्यान त्यांचा उजवा हात मळणी यंत्राक अडकला. त्यात हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पुढील सहा महिने पाटील कुठलेही काम करू शकत नाही. शेतमजुरीवर ते उदरनिर्वाह चालवित होते. घरात पत्नी व इतर कुटुंबिय आहेत. ही बाब लक्षात घेता त्यांना आर्थिक मदतीसाठी आसोदा रोड भागातील त्यांचे शेजारी व इतर मंडळी पुढे आली. त्यांनी आठ हजार रुपये गोळा केले. त्यांचे वितरण आमदार सुरेश भोळे यांच्याहस्ते शुक्रवारी झाले. अनिल कोळी, मनोहर बाविस्कर, अंकूश कोळी, नंदू कोली, संजय कोळी, उत्तम उभाळे आदींनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. तसेच पाटील यांच्या कुटुंबियांना २५ किलो तांदूळही देण्यात आले.

Web Title: Neighbors have come to the rescue of lost hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.