नेपाळने सहापैकी दोन चौक्या हटविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:29 AM2020-07-08T05:29:59+5:302020-07-08T05:30:37+5:30

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारताविरोधी घेतलेल्या भूमिकेला त्यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीकडून विरोध झाल्यानंतर सरकारने हे पाउल उचलले आहे.

Nepal removed two of the six Post | नेपाळने सहापैकी दोन चौक्या हटविल्या

नेपाळने सहापैकी दोन चौक्या हटविल्या

Next

नवी दिल्ली - उत्तराखंडच्या पिथौरगड जिल्'ात धारचुला भागात नेपाळने उभारलेल्या सहापैकी दोन चौक्या हटविल्या आहेत. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी भारताविरोधी घेतलेल्या भूमिकेला त्यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टीकडून विरोध झाल्यानंतर सरकारने हे पाउल उचलले आहे.
ओली यांच्या भविष्याचा फैसला करण्यासाठी स्थायी समितीने सोमवारी एक बैठकही आयोजित केली होती. मात्र, ती आता बुधवारी होणार आहे.

भारताकडून एका रस्त्याचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर नेपाळने या सहा चौक्या उभ्या केल्या होत्या. त्यानंतर नेपाळने नवा नकाशाही मंजूर करुन घेतला. धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी अनिलकुमार शुक्ला यांनी सांगितले की, नेपाळने या भागातील दोन चौक्या हटविल्या आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांसमक्ष आम्ही हा मुद्दा उपस्थित केला होता. आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की, उच्च अधिकाऱ्यांच्या निर्देशावरुन हे करण्यात आले होते. एका अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, उक्कू आणि बकरा या भागातील या दोन चौक्या हटविण्यात आल्या आहेत. नेपाळ आणखी तीन चौक्याही हटविणार असल्याचे वृत्त आहे.

Web Title: Nepal removed two of the six Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.