नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा नियुक्ती केल्यानंतर आलोक वर्मा यांची दुय्यम पदावर बदली करण्यात आली होती. तेव्हापासून सीबीआयचे संचालकपद प्रभारी अधिकाऱ्याच्या हाती सोपविण्यात आले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीची बैठक होत असून नवा सीबीआय संचालक ठरणार आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून सीबीआयमध्ये मोठे नाट्य घडले होते. यावरून मोदी यांच्या मर्जीतील अधिकारी राकेश अस्थाना यांच्याविरोधात चौकशी लावल्याने वर्मा यांना तडकाफडकी बदली करण्यात आले होते. वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत पुन्हा सीबीआय संचालक पद मिळविले होते. मात्र, त्यांची याच दिवशी मोदी यांनी बदली करत होमगार्डच्या संचालकपदी नियुक्ती केली होती.
आज नवे सीबीआय संचालक निवडीसाठी बैठक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी निव़ड समितीचे अध्यक्ष आहेत. तसेच न्यायमूर्ती सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे हो दोन सदस्य आहेत. वर्मा यांच्या बदलीला सिक्री यांनी मोदींच्या बाजुने मत दिले होते, तर खरगे यांनी विरोध केला होता. यामुळे आजच्या निवडीमध्ये एकूण 80 अधिकाऱ्यांच्या नावची यादीवर चर्चा केली जाणार आहे. यातून नवे सीबीआय अध्यक्ष निवडले जाणार आहेत.