देशभरात मोठे दहशतवादी हल्ले करण्य़ाच्या तयारीत असलेल्या तामिळनाडूतील दहशतवादी संघटनेच्या मुसक्या आवळण्यात राष्ट्रीय तपास संस्था एनआयएला यश आले आहे. या दहशतवाद्यांनी अंसारुल्ला नावाची संघटना स्थापन केली होती. शनिवारी एनआयएच्या पथकांनी तामिळनाडूमध्ये 16 ठिकाणी छापे मारले.
एनआयएकडून 9 जुलै रोजी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये संशयित दहशतवादी चेन्नई आणि नागपट्टीनम जिल्हयातील राहणारे आहेत. याशिवाय भारतभर त्यांच्या संघटनेचे लोक असून ते देशाविरोधात लढाई छेडणार होते.
भारतात इस्लामिक राज्याची स्थापना करायची आहेआरोपी सैयद मोहम्मद बुखारी, हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन यांना भारतामध्ये मुस्लिम राज्याची स्थापना करायची होती. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा केला होता. या सर्वांकर गैर कायदेशीर कारवाया रोखण्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सैयद बुखारीच्या घरी आणि कार्यालयामध्ये छापे टाकण्यात आले आहेत. याशिवाय हसन अली आणि मोहम्मद युसुफुद्दीन यांच्या नागपट्टिनम जिल्ह्यातही ठिकठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.