नितीशकुमारांनी INDIA आघाडीचं संयोजकपद नाकारलं, 'हे' नाव सूचवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 04:37 PM2024-01-13T16:37:22+5:302024-01-13T16:38:21+5:30

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत.

Nitish Kumar rejected the post of INDIA Aghadi convenor, suggested the name of lalu prasad yadav | नितीशकुमारांनी INDIA आघाडीचं संयोजकपद नाकारलं, 'हे' नाव सूचवलं

नितीशकुमारांनी INDIA आघाडीचं संयोजकपद नाकारलं, 'हे' नाव सूचवलं

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच रणधुमाळी जोरात सुरू असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी विकासामांच्या माध्यमातून मिरवत आहेत. तर, विरोधकही एकजुटीची मूट बांधताना दिसत आहेत. सध्या, विरोधकांच्या इंडिया आघाडीत सध्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. लवकरच जागावाटपाचे सूत्र निश्चित केले जाण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये १४ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी इंडिया आघाडीचं संयोजकपद नाकारलं.  

इंडिया आघाडीच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बैठकीला गैहजर आहेत. तर, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बैठकीत व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीच संयोजकपदी निवड व्हावी यासाठी संयुक्त जनता दल (जदयू) पक्षाकडून इंडिया आघाडीवर दबाव टाकला जात असल्याचे वृत्त होते. मात्र, या बैठकीत नितीशकुमार यांना इंडिया आघाडीचे संजोयक बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण, स्वत: नितीशकुमार यांनी तो प्रस्ताव नाकारला. त्यानंतर, त्यांनी लालू प्रसाद यादव यांचं नाव संयोजक पदासाठी सूचवलं. 

लालू यादव हे सर्वात वरिष्ठ नेते आहेत, म्हणून या आघाडीचे संजोयकपद त्यांनाच द्यायला हवं. तर, काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे इंडिया आघाडीचे चेअरमनपद काँग्रेसकडेच असावे, असेही त्यांनी म्हटले. या आघाडीत मी कुठल्याही पदावर न राहता काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे समजते. 

दरम्याान, काँग्रेस नेते सिताराम येचुरी, सोनिया गांधींसह इतर ब्लॉकच्या नेत्यांनी नितीशकुमार यांचे नाव संयोजकपदासाठी समोर आणले होते. या बैठकीला जदयुकडून स्वत: नितीशकुमार आणि पक्षाचे माजी अध्यक्ष ललनसिंह व संजय झा सहभागी झाले होते. नितीश कुमार यांनी, या बैठकीत बोलताना, जागावाटप हा सर्वात कठीण काम असल्याचे म्हटले. तसेच, काही बड्या पक्षाच्या प्रमुखांनी बैठकीत उपस्थिती न दर्शवल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली.  

जागावाटपावरुन एकमत कठीण

दरम्यान, इंडिया आघाडीची आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण, इंडिया आघाडीला जागावाटप अंतिम करायचे आहे. तर काँग्रेसची राष्ट्रीय आघाडी समिती दररोज राज्यनिहाय जागावाटपावर चर्चा करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने काँग्रेसला लोकसभेच्या ४२ जागांपैकी २ जागांची ऑफर दिली आहे. फक्त दोन जागा असल्यामुळे टीएमसीची या ऑफरसाठी तयारी नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. दरम्यान, टीएमसीशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी सांगितले की, टीएमसी बंगालमध्ये काँग्रेसला ३ जागा देण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी टीएमसीला आसाममध्ये दोन आणि मेघालयमध्ये एक जागा द्यावी लागेल.
 

Web Title: Nitish Kumar rejected the post of INDIA Aghadi convenor, suggested the name of lalu prasad yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.