पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर निघणार आहेत. यंदाचा प्रवास निवडणुकीच्या वर्षात, म्हणजेच 2025 मध्ये होईल. त्यामुळेच यंदाचा त्यांचा हा दौरा आणखीनच खास बनेल. यावेळी नितीशकुमार आपल्या यात्रेत कोणात्या मुद्द्यांवर भर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यादरम्यान ते काय बोलणार आणि कोणत्या घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल.
नितीश कुमार यांच्या यात्रेला 'महिला संवाद यात्रा' असे नाव देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही यात्रा खूप महत्त्वाची आहे. बिहारच्या महिला मतदारांवर नितीश कुमारांची नजर असून, या दौऱ्यादरम्यान नितीश राज्यातील महिला मतदारांशी संवाद साधतील आणि त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतील. महत्वाचे म्हणजे, या दौऱ्यानंतर ते राज्यातील महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय आणि घोषणा करू शकतात.
ड्रीम प्रोजेक्टचा आढावा घेणारनितीश कुमार यांच्या दौऱ्याची ब्ल्यू प्रिंट तयार झाली आहे. यातून नितीश कुमार दौऱ्यादरम्यान काय करणार, याची संपूर्ण माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान जिल्ह्याची निवड केली जाणार असून मुख्यमंत्री त्या जिल्ह्यात पोहोचल्यावर त्या जिल्ह्यातील काही ठिकाणांना भेटी देतील. यादरम्यान नितीश कुमार सात निश्चय भाग 1, सात निश्चय भाग-2, जल जीवन हरियाली आणि इतर महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतील.
विकासकामांची ग्राउंड रिॲलिटी जाणून घेणार यादरम्यान मुख्यमंत्री जिल्हास्तरीय योजनांची आढावा बैठक घेऊन विकासकामांचे वास्तव जाणून घेणार आहेत. या यात्रेसाठी सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सुचना पाठविण्यात आल्या असून त्यांनी स्थळाची निवड योग्य पद्धतीने करावी. 15 ते 25 डिसेंबर दरम्यान मुख्यमंत्र्यांचा दौरा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.