Indian Railway vacancy 2020: कोरोनाच्या महामारीमुळे रोजगारावर संकट आलेल्या तरुणांना सरकारी नोकरी (Sarkari job) मिळविण्याची आणखी एक संधी आहे. भारतीय रेल्वे (Indian Railway) च्या वेगवेगळ्या विभागात एक्ट अॅपरेंटीस पदांसाठी थेट भरती केली जात आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने यासाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.
रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या वेबसाईटवर या भरतीची माहिती दिलेली आहे. यानुसार अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नोटिफिकेशन आणि अप्लाय करण्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत.
पदाचे नाव - एक्ट अॅपरेंटीसपदाची संख्या - 1004
कोणत्या विभागात किती पदे....हुबळी विभाग - 287कॅरेज रिपेअर वर्कशॉप, हुबळी - 217बंगळुरु विभाग - 280म्हैसूर विभाग - 177सेंट्रल वर्कशॉप, म्हैसूर - 43
कोण अर्ज करू शकतात? देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचा १० वी पास झालेला इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतो. यासाठी त्याने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) केलेले हवे. अर्जदाराचे किमान वय १५ ते कमाल वय 24 वर्षे असायला हवे. आरक्षणातील उमेदवारांना वयाची अट शिथिल करण्यात आली आहे.
अर्ज कसा कराल? या नोकरीसाठी अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज ९ जानेवारी 2021पर्यंत करता येणार आहे.
अर्ज शुल्क : जनरल, ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. एससी, एसटी, दिव्यांग आणि महिलांसाठी निशुल्क आहे.
निवड कशी होईल? 10 वीच्या मार्कांच्या आधारे उमेदवारांची मेरिट लिस्ट तयार केली जाईल. या मेरिट लिस्टच्या आधारे योग्य उमेदवाराची निवड केली जाईल. वेगळी परिक्षा घेतली जाणार नाही.
डायरेक्ट लिंक्स...
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...RRC च्या वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...