Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2020 01:32 PM2020-03-01T13:32:46+5:302020-03-01T13:49:18+5:30

सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे.

non subsidised lpg gas cylinder price cut around metro cities SSS | Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर

Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर

Next
ठळक मुद्देदिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 805.50 रुपये आहे.सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे.1 मार्चपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. मात्र सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 मार्चपासून म्हणजेच आजपासून 53 रुपयांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2019 नंतर दरात कपात झाली आहे. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटनुसार, ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2020 पर्यंत तब्बल सहा वेळा गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली होती. दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 805.50 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 839.50 रुपये, मुंबईत 776.50 आणि चेन्नईमध्ये 826 रुपये आहे. 1 मार्चपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. 12 फेब्रुवारीला किमतीत वाढ झाली होती. इंडेन गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती. इंडियन ऑईलने गॅस सिलिंडरच्या किमतीत जवळपास 150 रुपयांची वाढ केली होती. 

Good news! Household gas cylinders may be cheaper in March; The prices have been rising from the past 4 months | खुशखबर ! मार्चमध्ये स्वस्त होऊ शकतो घरघुती <a href='https://www.lokmat.com/topics/cylinder/'>गॅस सिलेंडर</a>; मागील 4 महिन्यांपासून होतेय दरवाढ

विना अनुदानित 14 किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत 144.50 रुपयांपासून 149 रुपयांपर्यंत वाढ जाहीर करण्यात आली होती. तसेच 1 जानेवारी रोजी बजेट मांडण्यापूर्वी गॅस सिलिंडरच्या किमती भडकल्या होत्या. कमर्शिअल गॅस सिलिंडरमध्ये 224.98 रुपयांची वाढ झाली होती. दरमहिना सबसिडी आणि बदलत जाणाऱ्या बाजार भावानुसार गॅसच्या किमतीत बदल होत असतो. गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

“मुख्यमंत्र्यांची फसवी घोषणाच 'त्या' शेतकऱ्याच्या आत्महत्येला कारणीभूत”

CAA : हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहीन बागमध्ये जमावबंदीचा आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान

संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

 

Web Title: non subsidised lpg gas cylinder price cut around metro cities SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.