भोपाळ - खरे तर आंब्याला फळांचा राजा, असे म्हटले जाते. मात्र, मध्य प्रदेशातील कट्ठीवाडा भागात येणाऱ्या एका विशेष आंब्याला आपण फळांची महाराणी म्हणून शकता. कारण या आंब्याचे नाव 'नूरजहां' (Noor Jahan) असे आहे. या व्हरायटीच्या एका आंब्याची किंमत 1,000 रुपयांपर्यंत आहे. या आंब्याचे उत्पादन मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्ह्यातील कट्ठीवाडा भागातच होते. हा भाग गुजरातला गून आहे. हा परिसर इंदूरपासून जवळपास 250 किलो मीटर अंतरावर आहे. (Noor Jahan mango the queen of fruits from Madhya pradesh price 1000 rupees per peace)
मँगो मॅनचा कोविड योद्ध्यांना अनोखा सलाम, पद्मश्री खान चाचांच्या नर्सरीत 'मोदी आम'
एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'नूरजहां'च्या एका आंब्याची किंमत 500 रुपये ते 1,000 रुपये एवढी आहे. यावर्षी आंब्याचे उत्पादन अत्यंत चांगले झाले. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कट्ठीवाडा येथील एक आंबा उत्पादक शिवराज सिंह जाधव यांनी म्हटले आहे, की 'आमच्या बागेत नूरजहां आंब्याची तीन झाडे आहेत. याला जवळपास 250 आंबे आले. एका आंब्यासाठी 500 ते 1000 रुपये एवढा दर मिळत आहे. यासाठी आधीपासूनच बुकींग झाली आहे.'
वजन किती - त्यांनी सांगितले, की या आंब्यासाठी मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही आंबाप्रेमींनी बुकींग केली आहे. यावर्षी एका नूरजहां आंब्याचे वजन 2 ते 3.5 किलोपर्यंत आहे. या आंब्याच्या झाडाला जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात मोहोर लागतो आणि जून महिन्याच्या सुरुवातीला आंबे पिकून तयार होतात. विशेष म्हणजे, या आंबाची लांबी एक फूटांपर्यंत होऊ शकते.
आम खाओ, इम्युनिटी बढाओ! आंबे खाऊन वजन वाढतं हे विसरा, आणि आमरसाचे फायदे मोजा
या वर्षी, या आंब्याचे पीक चांगले आले. पण कोरोनामुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी प्रतिकूल हवामानामुळे नूरजहां आंब्याचे उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकले नाही. 2019 मध्ये या जातीच्या एका आंब्याचे वजन सरासरी 2.75 किलो होते आणि लोकांनी त्याला 1200 रुपये, एवढा भाव दिला होता, असे काठीवाडा येथील ‘नूरजहाँ’ आंब्याची लागवड करणारे तज्ज्ञ इशाक मन्सुरी यांनी म्हटले आहे.