Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये सोरेन यांच्या पक्षात ‘नॉट ऑल इज वेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:12 AM2022-08-30T10:12:14+5:302022-08-30T10:12:56+5:30

Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये राजकीय संकट कायम आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन गत चार दिवसांपासून यूपीएच्या आमदारांची ताकद दाखवित आहेत. सोरेन यांचे आमदार पद जाण्याची शक्यता आहे.

'Not all is well' in Soren's party in Jharkhand | Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये सोरेन यांच्या पक्षात ‘नॉट ऑल इज वेल’

Jharkhand Political Crisis: झारखंडमध्ये सोरेन यांच्या पक्षात ‘नॉट ऑल इज वेल’

Next

- एस. पी. सिन्हा 
रांची : झारखंडमध्ये राजकीय संकट कायम आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन गत चार दिवसांपासून यूपीएच्या आमदारांची ताकद दाखवित आहेत. सोरेन यांचे आमदार पद जाण्याची शक्यता आहे. अर्थात, आमदारकीवर टांगती तलवार असलेले सोरेन हे काही एकटे नाहीत, तर, अनेक नेते आहेत. 
अशीही चर्चा आहे की, मंत्रिपद न मिळाल्याने झामुमोचे काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे संधी मिळाली तर ते काही उलटसुलट करु शकतात. पक्षातील ही नाराजी पाहता काँग्रेस आणि झामुमोने आपल्या आमदारांना रांचीतच राहण्यास सांगितले आहे. जेणेकरुन आमदार विरोधी पक्षाकडे जाऊ नयेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लिंडा हे भाजपमध्ये जाणार होते. पण, अखेरच्या क्षणी त्यांनी आपला निर्णय बदलला.

Web Title: 'Not all is well' in Soren's party in Jharkhand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.