बँक खातं उघडण्यासाठी आता आधार अनिवार्य- केंद्र सरकार

By Admin | Published: June 16, 2017 04:48 PM2017-06-16T16:48:14+5:302017-06-16T16:48:14+5:30

गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं आधार कार्ड सक्तीचं करण्याच्या सूचना केल्या होत्या.

Now the mandatory mandatory for opening a bank account - Central Government | बँक खातं उघडण्यासाठी आता आधार अनिवार्य- केंद्र सरकार

बँक खातं उघडण्यासाठी आता आधार अनिवार्य- केंद्र सरकार

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं आधार कार्ड सक्तीचं करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसारच आतापासून नवे बँक खाते उघडण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांनी आतापर्यंत बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं नाही, त्यांनाही केंद्र सरकारनं अंतिम मुदत दिली आहे. त्याप्रमाणेच 50 हजारांहून अधिकची रक्कम बँकेत जमा करण्यासाठीही आता आधार कार्ड लागणार आहे. सर्व खातेधारकांना 31 डिसेंबर 2017पर्यंत आधार कार्ड नंबर बँकेत जमा करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. तसं न केल्यास खातं बंद होण्याचीही शक्यता आहे.

देशभरात कोटींहून अधिक लोकांचे आधार कार्ड आतापर्यंत तयार झाले आहेत. जवळपास देशातल्या 80 टक्के जनतेकडे आधार कार्ड आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा(यूआईडीएआई)ने आतापर्यंत अब्जांहून अधिक आधार कार्ड दिले आहेत. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. प्रसाद म्हणाले, देशातील 100 कोटींहून अधिक निवासी नागरिक आधारअंतर्गत नोंदणीकृत आहेत. आधारच्या माध्यमातून गरिबांपर्यंतही पोहोचता येऊ शकते. 

आधार कायदा २0१६नुसार आधार कार्ड मिळण्यास जे पात्र आहेत, अशांनाच प्राप्तिकर विवरणपत्रात आधार क्रमांक नोंदविण्याचे बंधन आहे. या कायद्यानुसार वित्तीय आणि अन्य स्वरूपाची सबसिडी, लाभ आणि सेवा घेणाऱ्यांना आधार कार्ड काढण्याचा हक्क आहे. आधार कायद्यानुसार, जे लोक भारताचे निवासी आहेत, त्यांना आधार कार्ड मिळू शकते. 12 महिन्यांच्या काळापैकी 182 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जे लोक भारतात राहिले आहेत, त्या सर्व लोकांना आधार क्रमांक मिळवण्याचा अधिकार आहे. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139 अ अन्वये जे लोक भारताचे निवासी नाहीत, त्यांना विवरणपत्रासोबत आधार क्रमांक देण्याची गरज नाही. याशिवाय आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालय यांनाही पॅन-आधार जोडणीतून सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त जे नागरिक 80 वर्षांपेक्षा जास्त ज्येष्ठ आहेत, त्यांना ही जोडणी बंधनकारक नाही.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार-पॅन जोडी बंधनकारक असणाऱ्यांसाठी प्राप्तिकर विभागाने एसएमएस सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशिष्ट नमुन्यात 567678 आणि 56161 या क्रमांकावर आधार क्रमांक एसएमएस केल्यास पॅन क्रमांकाला आधार जोडला जाईल, असे प्राप्तिकर विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

Web Title: Now the mandatory mandatory for opening a bank account - Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.