स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सावरकरांना बदनाम करण्याची मोहिम सुरु आहे. आजच्या काळात वीर सावरकर यांच्या बाबतच्या खऱ्या माहितीचा अभाव जाणवत असल्याचे भागवत म्हणाले.
भागवत म्हणाले, आरएसएस आणि सावरकरांवर टीका-टिप्पणी केली जातेय. येत्या काळात स्वामी विवेकानंद, दयानंद आणि स्वामी अरविंद यांचा नंबर येईल. भारताला जोडण्यामुळे ज्याचे दुकान बंद होईल त्याला ते चांगले वाटणार नाही. असे जोडण्याच्या विचाराला धर्म म्हटले जाते. मात्र, हे धर्म जोडण्याचे आहे ना ही पूजा पद्धतीच्या आधारावर विभाजन करणारे. यालाच मानवता किंवा संपूर्ण जगाची एकता म्हटले जाते. वीर सावरकरांनी यालाच हिंदुत्व म्हटले आहे, असे भागवत म्हणाले.
एवढ्या वर्षांनी आम्ही जेव्हा परिस्थितीला पाहतो तेव्हा लक्षात येते की जोरजोराने बोलण्याची गरज तेव्हा होती. सर्वजण बोलले असते तर कदाचित देशाचे विभाजन झाले नसते. सावरकरांचे हिंदूत्व, विवेकानंदांचे हिंदूत्व हे बोलण्याची आता फॅशन झाली आहे. हिंदूत्व एकच आहे, जे आधीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहील, असे देखील भागवतांनी सांगितले.
सैयद अहमद यांना मुस्लिम असंतोषाचे जनक म्हटले जाते. इतिहासात दारा शिकोह, अकबर झाले, पण औरंगजेब देखील होताच, ज्याने चाक उलट दिशेने फिरविले. अशफाक उल्लाह खान यांनी म्हटले होते, मेल्यानंतर जो पुढला जन्म मिळेल तो भारतात घेईन. अशा लोकांची नावे पुढे आली पाहिजेत, असेही भागवत यांनी सांगितले.
सावरकरांचे युग येतेय...संसदेच आज काय होत नाहीय, फक्त मारहाण होत नाहीय बाकी सारे होते. बाहेर येतात एकत्र चहा पितात, एकमेकांकडे लग्नांना जातात. इथे सर्व समान आहे, यामुळे विशेषाधिकाराची भाषा कोणी करू नये. सुरक्षा नीति चालेल, सुरक्षेची चर्चा होईल पण राष्ट्रनीतिच्या मागे. काही लोकांनुसार 2014 नंतर सावरकर युग येत आहे, हे बरोबर आहे. सर्वाची जबाबदारी आणि भागीदारी असेल, हेच हिंदुत्व आहे, असेही भागवत म्हणाले.