दुराव्यानंतर आता हस्तांदोलन
By admin | Published: November 27, 2014 11:55 PM2014-11-27T23:55:16+5:302014-11-27T23:55:16+5:30
बुधवारी सार्क परिषदेच्या कार्यक्रमात परस्परांना पाहणोदेखील टाळणारे, भारत व पाकचे पंतप्रधान आजच्या निरोप समारंभात थोडे खुललेले आढळले.
Next
सार्क शिखर परिषदेचा समारोप : निरोप समारंभात मोदी व शरीफ यांचे हसणो-बोलणो
काठमांडू : बुधवारी सार्क परिषदेच्या कार्यक्रमात परस्परांना पाहणोदेखील टाळणारे, भारत व पाकचे पंतप्रधान आजच्या निरोप समारंभात थोडे खुललेले आढळले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी निरोप समारंभात परस्पर हस्तांदोलन केले आणि सुहास्यवदनाने थोडेफार संभाषणही केले. सार्क परिषदेतही यामुळे हलकेफुलके वातावरण तयार झाले.
मोदी यांनी शरीफ यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि हस्तांदोलन करताना कॅमे:यात पोझ दिली. दोघांनी एकमेकांशी एक-दोन वाक्यांची देवाणघेवाणही केली. भारत-पाक यांच्यातील तणाव निवळल्याचे स्वागत उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने केले.
यावर भारताचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी टि¦ट केले असून, ज्या फोटोची आपण सर्वजण वाट पाहत होतो..असे म्हटले आहे. गुरुवारी या दोन नेत्यांनी दोनदा हस्तांदोलन केले. काठमांडू शहराबाहेर पार पडलेल्या रिट्रिट कार्यक्रमात प्रथम अशी संधी आली.
सार्क परिषद पुढच्या वर्षी इस्लामाबाद येथे घेण्याचा निर्णय झाला. त्यावर नवाज शरीफ आभारप्रदर्शन करीत असताना मोदी यांनी टाळ्या वाजवल्या. (वृत्तसंस्था)
4सार्क परिषदेत नेहमीच भारत-पाक यांच्या संबंधाकडे सर्वाचे लक्ष असते. भारत व पाकिस्तानचे नेते काय करतात, याला नेहमीच महत्त्व असते. 18 व्या सार्क परिषदेतही असेच झाले.
4बुधवारी उद्घाटन समारंभात मोदी व शरीफ यांनी परस्परांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे परिषदेत काहीसा तणाव होता; पण आज या दोन नेत्यांनी हस्तांदोलन करून एकमेकांशी संवाद साधताच नेपाळचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. शिखर परिषदेसाठी हा एक सकारात्मक मुद्दा ठरला.