आता तृणमूल काँग्रेसची शिवसेनेला टाळी,सत्ताधा-यांना घेरण्यासाठी रणनीती आखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:58 AM2017-11-24T03:58:19+5:302017-11-24T03:58:39+5:30
भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रणनिती आखणा-या तृणमूल काँग्रेसने आता शिवसेनेला टाळी दिली आहे.
टेकचंद सोनवणे
नवी दिल्ली : भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी रणनिती आखणा-या तृणमूल काँग्रेसने आता शिवसेनेला टाळी दिली आहे. हिवाळी अधिवेशनात लोकहिताच्या मुद्यांवर सत्ताधारी भाजपविरोधात शिवसेनेला सोबत घेण्याचे संकेत तृणमूलचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी दिले. संसदेत तृणमूल व शिवसेना एकत्र आल्यास दिल्लीत भाजपविरोधात नवी समीकरणे तयार होतील. तृणमूल अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. हा संदर्भ देत ब्रायन यांनी लोकमतला सांगितले की, आम्ही राजकीय जुळवाजुळव करीत नाही. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी ते भेटले होते. नोटबंदीविरोधात दिल्लीत झालेल्या मोर्च्यात सेना खासदार सहभागी झाले होते. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांवर संसदेतही आम्ही एकत्र येवू.
>आम्ही भाजपाच्या दाव्यांची पोलखोल करू
अभ्यासू खासदार म्हणून परिचित असलेल्या ब्रायन यांच्या ‘इनसाइड द पार्लिमेंट; व्ह्यूव फ्रॉम द फं्रट रो’ या पुस्तकाचे दिल्लीत प्रकाशन झाले. यात ४६ लेख व भाषणे आहेत. भाजपला २०१९ साली पराभूत कसे करावे- या त्यातील लेखाची सवार्धिक चर्चा आहे. त्यावर ब्रायन म्हणाले, भाजप करीत असलेल्या दाव्यांची आम्ही पोलखोल करू.