आधारऐवजी आता व्हर्च्युअल आयडी! सुरक्षित पर्याय, प्रत्येक वेळी नवा क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 06:07 AM2018-01-11T06:07:58+5:302018-01-11T06:08:11+5:30
मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ सुरू करणार आहे.
नवी दिल्ली : मोबाइलचे सिमकार्ड संलग्न करणे किंवा अन्य कारणांसाठी ‘आधार’ क्रमांक दिल्यावर त्या व्यक्तीची सर्व माहिती त्रयस्थाच्या हाती पडून तिचा दुरुपयोग होण्याचा धोका टाळण्यासाठी ‘आधार’धारकांना आता एकदाच वापरता येईल, असा आभासी सांकेतिक क्रमांक (व्हर्च्युअल आयडी) देण्याची नवी सोय ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ सुरू करणार आहे.
यामुळे आपला ‘आधार’ क्रमांक न उघड करता ‘व्हर्च्युअल आयडी’ क्रमांक देऊन गरज भागविण्याचा अधिक सुरक्षित पर्याय मिळेल. ‘व्हर्च्युअल आयडी’ कोणत्याही क्रमवारीविना तयार झालेला १६ अंकी आकडा असेल.
त्यावरून मोबाइल कंपनी किंवा अन्य सेवा पुरवठादारांना त्या व्यक्तीचे नाव, पत्ता व छायाचित्र अशी त्या कामासाठी पुरेशी ठरणारी माहिती उपलब्ध होईल. आधारधारकांना ‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करून घेता येईल. हा ‘व्हर्च्युअल आयडी’ एकदा वापरला, की त्याची उपयुक्तता संपुष्टात येईल. त्यामुळे प्रत्येक वेळी वापर करताना नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ घ्यावा लागेल.
१ जूनपासून नवी सोय
‘यूआयडीएआय’च्या वेबसाइटवरून असा ‘व्हर्च्युअल आयडी’ ‘जनरेट’ करण्याची सोय १ मार्च २०१८ पासून सुरू होईल.
केवायसी व ‘आधार’ संग्लनतेचे अधिकार दिलेल्या सर्व सेवा पुरवठादारांना १ जून २०१८ पासून अशा ‘व्हर्च्युअल आयडी’च्या आधारे काम करणे सक्तीचे असेल.
थोडक्यात याचे स्वरूप ‘वन टाइम पासवर्ड’ (ओटीपी) सारखे असेल. ‘आधार’धारक लागेल त्या त्या वेळेला व कितीही वेळा नवा ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.
सेवा पुरवठादारास
‘व्हर्च्युअल आयडी’ व
हाताच्या बोटाचे ठसे दिले
की त्याचे काम भागेल
‘आधार’धारकासच
स्वत:साठी ‘व्हर्च्युअल आयडी’ तयार करून घेता येईल.
त्याचा ‘आधार’ क्रमांक
घेऊन सेवा पुरवठादाराने ‘व्हर्च्युअल आयडी’ मिळवण्यास मज्जाव असेल.
सध्या जेथे जेथे फॉर्ममध्ये ‘आधार’ क्रमांक द्यावा
लागतो, तेथे ‘व्हर्च्युअल आयडी’ देता येईल.