कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 03:39 AM2020-06-12T03:39:50+5:302020-06-12T03:40:00+5:30
विषाणूचा खात्मा करणाºया अँटिबॉडीज शोधल्याचा सिंगापूरच्या कंपनीचा दावा
नवी दिल्ली : कोरोनाने जगभर हाहाकार मांडला आहे. सर्व देशांमधील संशोधक कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. अशात जे लोक कोरोनामुळे वेंटिलेटरवर आहेत त्यां?ा असलेला धोका कमी करू शकणारे औषध शोधण्यात यश आल्याचा दावा संशोधकांनी केला.
सिंगापूर येथील बायोटेक्नॉलॉजी कंपनी तायचानद्वारे पुढील आठवड्यापासून कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या चाचणीला सुरुवात करणार आहे. चाचणीतून या अँडीबाडीज कोरोनावर किती प्रभावी आहेत, हे तपासता येणार आहे. या मोनोक्लोनल अँटिबॉडीज शरीरातील इतर नैसर्गिक अँटिबॉडीजप्रमाणेच काम करतात, असे दिसून आले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अशा कोणत्याही अँटिबॉडीज उपलब्ध नाहीत ज्या कोरोना विषाणूचा खात्मा करू शकतात. तायचान ही पहिली अशी कंपनी आहेस जी तयार केलेल्या अँटिबॉडीजचे परीक्षण मनुष्यावर करणार आहे. नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ सिंगापूर मेडिकल स्कूलच्या प्राध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार या चाचणीचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यास लगेचच त्याचा वापर रुग्णांना बरे करण्यासाठी केला जाणार आहे.
च्हे औषध परिणामकारक ठरल्यास कोरोनामुळे होणाºया मृत्यूंचे प्रमाणही कमी करणे शक्य होणार आहे. तसेच औषध आरोग्य विभागात काम करणाºया कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कारण यामुळे माणसाची प्रतिकारशक्ती वाढते.