देशातील 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड'ची योजना सुरू, रामविलास पासवान यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 10:31 PM2020-01-01T22:31:06+5:302020-01-01T22:35:59+5:30
'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे.
नवी दिल्ली : देशातील 12 राज्यांमध्ये 'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना आजपासून सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरवरून याबाबतची घोषणा केली आहे.
आज 1 जानेवारी 2020 पासून देशातील एकूण 12 राज्यांत 'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना सुरु करण्यात आली आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरयाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये ही 'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच, जून 2020 पर्यंत देशातील सर्व राज्यांत ही योजना अंमलात आणली जाणार आहे, असे रामविलास पासवान यांनी सांगितले आहे.
आज 1 जनवरी 2020 से देश के कुल 12 राज्यों आंध्रप्रदेश, तेलंगाना, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरल, मध्यप्रदेश, गोवा, झारखंड और त्रिपुरा में *एक राष्ट्र एक राशनकार्ड* की सुविधा की शुरुआत हो गई है। 1/2 #OneNationOneRationCard
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) January 1, 2020
दरम्यान, 'एक देश, एक रेशन कार्ड' ची योजना ई-पीओएस मशीनवर बायोमॅट्रिक आधारवर अवलंबून आहे. कामगार व दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. 'एक देश, एक रेशन कार्ड' अंतर्गत देशातील कोणत्याही भागातून रेशन दुकानातून खाद्य सामान घेता येऊ शकणार आहे.
इन 12 राज्यों के जनवितरण प्रणाली के लाभुक अब इन किसी भी राज्य में निवास करते हुए अपने अभी के राशनकार्ड से ही अपने हिस्से का राशन प्राप्त कर सकते हैं। जून 2020 तक देश के सभी राज्यों को इससे जोड़ा जाएगा। 2/2 #OneNationOneRationCard
— Ram Vilas Paswan (@irvpaswan) January 1, 2020