कोरोना संकटानंतर विदेशी नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2020 05:03 AM2020-06-04T05:03:56+5:302020-06-04T05:04:13+5:30

केंद्र सरकारचा मोठा पुढाकार : उद्योगपती, संशोधक, इंजिनिअर आदींना दिली जाणार विशेष सूट

Open the way for foreign nationals to come to India after the Corona crisis | कोरोना संकटानंतर विदेशी नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

कोरोना संकटानंतर विदेशी नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

Next

नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे आंतरराष्टÑीय उड्डाणांवरील निर्बंध अद्याप हटवले नसले तरी सरकारने विदेशी नागरिकांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाने सध्या तरी काही खास व्यक्तींना भारतात येण्याची सूट दिलेली आहे. यात विदेशी व्यावसायिक, डॉक्टर व अभियंत्यांचा समावेश केला आहे.


मंत्रालयाच्या विदेश विभागाच्या एका आदेशानुसार, आता विदेशी व्यावसायिक व्यवसायासाठी भारतात येऊ शकतात. तथापि, ही सूट केवळ जे गैरअधिसूचित आहेत व चार्टर्ड फ्लाईटने भारतात येतील, त्यांनाच देण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य व प्रयोगशाळा तसेच कारखान्यांत काम करणारे विदेशी आरोग्य व्यावसायिक, संधोधनकर्ते, अभियंते व तंत्रज्ञांनाही व्हिसा नियमांत भारतात येण्याची सूट दिली आहे. तथापि, ही सूट त्यांनाच मिळेल, ज्यांना भारतातील एखाद्या मान्यताप्राप्त व पंजीकृत आरोग्य सेवा संस्थान, औषध कंपनी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाने आमंत्रित केलेले असेल.


तज्ज्ञांना बोलावता येणार
च्भारतात व्यवसायासाठी येणाऱ्या विदेशी कंपन्यांचे अभियंते व व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनाही भारतात येण्याची सूट देण्यात आली आहे.
च्यात उत्पादन, डिझाईन, सॉफ्टवेअर, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाºयांचा समावेश करण्यात आला आहे.
च्याबरोबरच विदेशात तयार झालेल्या मशीनचा वापर करणाºया भारतीय व्यावसायिक संस्थांनाही त्या मशीन विदेशी तज्ज्ञांना भारतात बोलावण्याची सूटही दिली गेली आहे.

Web Title: Open the way for foreign nationals to come to India after the Corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.