Opposition less Government in Nagaland: नागालँडमध्ये चालली NDA ची जादू; सर्व विरोधी पक्षांचा BJP-NDPP ला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 07:06 PM2023-03-06T19:06:38+5:302023-03-06T19:07:01+5:30
Opposition less Government in Nagaland: सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यामुळे नागालँड विरोधीपक्ष नसलेले राज्य बनणार आहे.
Lagaland Assembly Election: काही दिवसांपूर्वीच त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यातील त्रिपुरा आणि नागालँडमध्ये एनडीला बहुमत मिळाले आहे. विशेष म्हणजे, नागालँडमध्ये सर्वच पक्षांनी एनडीला पाठिंबा दिला असून, आता नागालँड विरोधीपक्ष नसलेले राज्य बनले आहे. एनडीपीपी-भाजपा युतीला जवळजवळ सर्व पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दर्शविला आहे. मागील वेळी 2018 विधानसभा निवडणुकीतही असेच घडले होते. त्यावेळीही नागालँडचे सर्व 60 आमदार सरकारमध्ये सामील होते.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 मार्च रोजी आले, यात एनडीपीपीने 25 आणि भाजपाने 12 जागा जिंकल्या. निवडणुकीपूर्वी या दोन्ही पक्षांची युती झाली होती. तसेच, एनसीपी तिसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. एनसीपीने सात जागा जिंकल्या आहेत. या व्यतिरिक्त एनपीपीच्या पाच आणि इतर चार अपक्षांनी जिंकल्या आहेत. इतके पक्ष नागालँड विधानसभेत येण्याची पहिलीच वेळ आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोक जनशक्ती पार्टी (राम विलास पासवान) आणि एनपीएफचे दोन सदस्यही विजयी झाले आहेत. एनडीपीपी-भाजपाने अद्याप सरकारच्या स्थापनेचा दावा केलेला नसला तरी, त्यांना इतर राजकीय पक्षांकडून बिनशर्त पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे आता नागालँड विरोधीपक्ष नसलेले राज्य म्हणून समोर येणार आहे.