'मुलाने बाळासाहेब ठाकरेंचे दुकान बंद केले', भाजपने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 03:13 PM2023-06-23T15:13:06+5:302023-06-23T15:13:53+5:30

देशातील विरोधी पक्षांची बिहारमध्ये बैठक सुरू आहे, या बैठकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत.

opposition meeting balasaheb thackeray son closed shiv sena shop bjp nadda uddhav thackeray | 'मुलाने बाळासाहेब ठाकरेंचे दुकान बंद केले', भाजपने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

'मुलाने बाळासाहेब ठाकरेंचे दुकान बंद केले', भाजपने उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

googlenewsNext

बिहारमध्ये देशातील १५ विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीत २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा सुरू आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार उपस्थित आहेत. यावरुन आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. नड्डा म्हणाले, "उद्धव ठाकरे आज पाटण्यात पोहोचले आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की ते शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाहीत." मला काँग्रेसशी हातमिळवणी करावी लागेल, तेव्हा मी दुकान बंद करेन.' आज बाळासाहेब ठाकरे विचार करत असतील की दुसरे कोणी नाही तर माझ्या मुलानेच दुकान बंद केले.

टायमिंग! विरोधकांची बिहारमध्ये बैठक, केसीआर यांच्या मुलाने दिल्लीत अमित शहा, राजनाथ सिंहांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विरोधकांच्या बैठकीत जोरदार टीका केली. या बैठकीत सर्व घराणेशाही पक्ष आपापल्या कुटुंबांना वाचवण्यासाठी युती करत आहेत. २०१९ मध्येही असेच प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उद्धव ठाकरे यांना टोला लगावत ते म्हणाले, "आम्हाला रोज टोमणा मारणारे उद्धव ठाकरे मेहबुबा मुफ्तीसोबत गेले, हे पाहून मला आश्चर्य वाटते. आता ते स्वतः मेहबुबा मुफ्तींच्या शेजारी बसून युतीबाबत बोलत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव या बैठकीचे आयोजन करत आहेत. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते उपस्थित आहेत.

Web Title: opposition meeting balasaheb thackeray son closed shiv sena shop bjp nadda uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.