भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:28 AM2018-10-22T04:28:44+5:302018-10-22T04:28:51+5:30

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे.

Opposition parties want to get rid of power from power | भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी हवी विरोधी पक्षांची आघाडी

Next

कोलकाता : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सत्ता स्थापन करणे ही गोष्ट सध्याच्या स्थितीत काँग्रेससाठी कठीण आहे, असे मत त्या पक्षाचे नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले आहे. भाजपला सत्तेतून घालविण्यासाठीच विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
खुर्शीद म्हणाले की, काँग्रेसवर मर्यादा येणार नाहीत याची दक्षता विरोधी पक्षांबरोबर आघाडी करताना घेण्यात यावी. अशी आघाडी करताना प्रत्येकाला काही ना काही त्याग करावाच लागेल. तशाच मनोभूमिकेतून विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी झाले पाहिजे. स्वबळावर सरकार स्थापन करण्याचे उद्दिष्ट मनात असेल, तर त्यादृष्टीने काँग्रेसला पुढील पाच वर्षे काम करावे लागेल. विरोधी पक्षांच्या आघाडीत तीन वर्षे राहिल्यानंतर त्यातून एकदम बाहेर पडून पुढची दोन वर्षे स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी काम करायला जाल, तर ते अयोग्य ठरेल. कोणत्याही उद्दिष्टासाठी त्याच विचाराने पुढील निवडणुका येईपर्यंत सातत्याने काम करायला हवे. विद्यमान स्थितीत काँग्रेसला आघाडी करण्याची इच्छा असून, ती प्रत्यक्षात येण्यासाठी आमचे जोरकस प्रयत्न सुरू आहेत.
ते म्हणाले की, देशात सर्व राज्यांत जागा जिंकू शकेल असा विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. बाकी पक्ष आपापल्या राज्यात उत्तम कामगिरी बजावू शकतात. देशातील लोकसभेच्या एकूण जागा व एखाद्या राज्यातील जागा यांच्या वाटपाबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये खूपच फरक असतो. जागावाटपामध्ये व्यावहारिक तोडगा काढणे जास्त महत्त्वाचे आहे. आघाडीत सामील होणाºया विरोधी पक्षांनी हे भान राखायला हवे.
>आघाडीच्या स्थापनेत अनेक अडचणी
काँग्रेसने आघाडीचा प्रयत्न चालविला असला तरी ते उद्दिष्ट साध्य होण्यात अनेक अडचणी आहेत. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचे जाहीर केले आहे.
मध्यप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने काँग्रेसबरोबर युती करण्यास नकार दिला आहे. काँग्रेस आघाडी फार काळ टिकवत नाही, असा या पक्षाचा आरोप आहे.
सलमान खुर्शीद म्हणाले की, मोदी सरकारचा लोकसभा निवडणुकांत पराभव करणे हाच आघाडी स्थापन करण्यामागचा उद्देश आहे. हा मूळ हेतूच विसरला गेला, तर अपेक्षित यश मिळणार नाही. त्यात आघाडीतील प्रत्येक पक्षाचे व पर्यायाने देशाचेही नुकसान होईल.

Web Title: Opposition parties want to get rid of power from power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.