OROP - माजी सैनिकांनी केला पदकं जाळण्याचा प्रयत्न

By admin | Published: November 11, 2015 05:30 PM2015-11-11T17:30:10+5:302015-11-11T17:30:10+5:30

वन रँक वन पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या योजनेवर काही माजी सैनिक समाधानी नसून काही माजी जवानांनी तर आपली पदके जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला

OROP - Ex-servicemen try to burn medals | OROP - माजी सैनिकांनी केला पदकं जाळण्याचा प्रयत्न

OROP - माजी सैनिकांनी केला पदकं जाळण्याचा प्रयत्न

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - वन रँक वन पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या योजनेवर काही माजी सैनिक समाधानी नसून काही माजी जवानांनी तर आपली पदके जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अन्य जवानांनी त्यांना पदके जाळण्यापासून थोपवले आणि अनुचित प्रकार टळला. परंतु, अनेक माजी सैनिकांनी सरकारने आम्हाला फसवल्याची भावना व्यक्त केली असून काही जवानांनी आपल्या मागण्यांसाठी बुधवारी राष्ट्रपतींच्या निवासस्थानावर मोर्ची काढला. या मोर्चाला रेल भवनजवळ पोलीसांनी अडवले. शेकडो माजी सैनिकांनी आपापली पदके परत करत पुरस्कारवापसीसारखा पदक वापसीचा मार्ग स्वीकारला, त्यावरदेखील संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी नाराजी व्यक्त करत आर्थिक मागण्यांशी संबंधित विषय असताना शौर्याशी संबंधित पदके परत करू नयेत असे आवाहन त्यांनी केले.
केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार जवळपास ८,८०० कोटी रुपयांचा बोजा उचलत बहुप्रतीक्षित अशी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. सगळ्यांनाच संपूर्ण खुश करता येणं शक्य नाही असं सांगत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. परंतु योजनेतील काही कलमांबाबत तीव्र मतभेद असून माजी सैनिक अजूनही असंतुष्ट आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमध्ये आज सैनिकांसमवेत दिवाली साजरी करताना वन रँक वन पेन्शन संदर्भात एक समिती नेमण्यात आली असून सैनिकांना ज्या काही सूचना करायच्या असतिल त्या त्यांनी या समितीकडे कराव्यात असे सांगितले.

Web Title: OROP - Ex-servicemen try to burn medals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.