Bhopal Railway Station: भोपाळ रेल्वे स्थानकात ओव्हर ब्रिजचा भाग कोसळला, सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 10:46 AM2020-02-13T10:46:20+5:302020-02-13T11:00:33+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये रेल्वे स्थानकात फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असलेल्या फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळला. यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत. बचावकार्य सुरु असून जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Madhya Pradesh: At least 6 people injured after portion of a footover bridge at Bhopal railway station collapsed this morning. The injured have been sent to a hospital. More details awaited. pic.twitter.com/bcmkegZq2S
— ANI (@ANI) February 13, 2020
दरम्यान, रेल्वे स्थानकांमध्ये फूट ओव्हर ब्रिज कोसळण्याच्या घटना या आधीही घडल्या आहेत. गेल्या वर्षी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील फूट ओव्हर ब्रिज कोसळला होता. यामध्ये दोघांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते.