नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी दिवंगत भाजप नेते अरुण जेटली, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, माजी रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर), मुष्टियोद्धा मेरी कोम आणि मॉरिशसचे अनिरुद्ध जगन्नाथ यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), उद्योजक आनंद महिंद्रा, बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू यांना पद्मभूषण सन्मान जाहीर झाला. तर महाराष्ट्रातून बीजमाता राहीबाई पोपेरे, क्रिकेटपटू झहीर खान, आदर्श सरपंच पोपटराव पवार, माजी राज्यपाल एस.सी जमीर, निर्माती एकता कपूर, मुस्लीम सत्यशोधक मंचाचे सय्यदभाई व विख्यात गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला.
विविध क्षेत्रांत कामगिरी करणाऱ्या १४१ जणांना शनिवारी पद्म पुरस्कार जाहीर झाला. देशी बियाणांचे जतन करून बियाणांची बँक स्थापन करणाºया ‘मदर आॅफ सीड’ म्हणजेच ‘बीजमाता’ अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात राहणाºया राहीबाई पोपेरे यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राहीबार्इंनी पारंपरिक पद्धतीने ५३ विविध देशी आणि दुर्मीळ वाणांच्या ११३ जातींचे संवर्धन केले आहे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, अहमदनगरचे आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दोन दशकांपासून दरवर्षी ५०० पेक्षा अधिक गरीब रुग्णांच्या भोजनाची व्यवस्था करणारे व लंगर बाबा अशी ओळख असलेले जगदीश लाल आहुजा, काश्मीरमधील दिव्यांग मुलांसाठी कार्य करणारे जावेद अहमद टाक, अरुणाचल प्रदेशमध्ये दुर्गम भागातील शिक्षणासाठी कार्य करणारे सत्यनारायण मुनड्यूर, तामिळनाडूमध्ये दिव्यांगांसाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते एस. रामकृष्ण, उत्तरेत दुर्गम भागातील लोकांना मोफत आरोग्य सुविधा पुरवणारे योगी एरोन, गेल्या २५ वर्षांत २५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे मोहम्मद शरीफ, वनसंवर्धनासाठी कार्य करणाºया तुलसी गौडा, भजन गायक मुन्ना मास्टर, भोपाळ गॅस दुर्घटनेविरोधात लढा देणारे अब्दुल जब्बार (मरणोत्तर) यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कारांची यादीपद्मविभूषण : जॉर्ज फर्नांडिस (मरणोत्तर)- (बिहार), अरुण जेटली (मरणोत्तर)-(दिल्ली), अनिरूद्ध जगन्नाथ जीसीएसके (मॉरिशस), एम. सी. मेरी कोम (मणिपूर), छन्नूलाल मिश्रा (उत्तर प्रदेश) , सुषमा स्वराज (मरणोत्तर) (दिल्ली), विश्वेशतीर्थ स्वामीजी श्री पेजावर अधोक्षज मठ उडुपी (मरणोत्तर) (कर्नाटक)पद्मभूषण : एम. मुमताज अली (केरळ), सईद मुअज्जीम अली (मरणोत्तर) (बांगलादेश), मुजफ्फर हुसेन बेग (जम्मू-काश्मीर), अजय चक्रवर्ती - कला (पश्चिम बंगाल), मनोज दास -साहित्य, शिक्षण (पुडुच्चेरी), बालकृष्ण दोशी -स्थापत्य (गुजरात), कृष्णम्मल जगन्नाथन-सामजिक कार्य (तमिळनाडू), एस. सी. जमीर (नागालँड), अनिल प्रकाश जोशी -सामाजिक कार्य (उत्तराखंड), डॉ. त्सेरिंग लंडोल -औषधी (लडाख), आनंद महिंद्रा -व्यापार, उद्योग (महाराष्टÑ), नीलकांत रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर) (केरळ), मनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रीकर (मरणोत्तर) (गोवा), जगदीश शेठ -साहित्य, शिक्षण (अमेरिका), पी. व्ही. सिंधू -क्रीडा (तेलंगणा), रेणू श्रीनिवासन -व्यापार, उद्योग (तमिळनाडू)
पद्मश्री : गुरू शशधर आचार्य -कला (झारखंड), डॉ. योगी आयरॉन -औषधी (उत्तराखंड), जयप्रकाश अग्रवाल-व्यापार व उद्योग (दिल्ली), जगदीश लाल अहुजा -सामाजिक कार्य (पंजाब), ग्लोरिया अॅरेइरा -साहित्य व शिक्षण (ब्राझील), खान झहीरखान बख्तियारखान -क्रीडा (महाराष्ट्र), डॉ. पद्मावती बंदोपाध्याय -औषधी (उत्तर प्रदेश), डॉ. सुसोवन बॅनर्जी -औषधी (प. बंगाल), डॉ. दिगंबर बेहेरा -औषधी (चंदीगड), डॉ. दमयंती बेश्रा -साहित्य व शिक्षण (ओडिशा), पवार पोपटराव भागुजी-सामाजिक कार्य (महाराष्ट्र), हिंमतराम भांभू-सामाजिक कार्य (राजस्थान), काझी मासूम अख्तर -साहित्य व शिक्षण (प. बंगाल), संजीव भीकचंदानी -व्यापार व उद्योग (उत्तर प्रदेश), गफूरभाई एम. बिलाखिया -व्यापार व उद्योग (गुजरात), बॉब ब्लॅकमन - सार्वजनिक जीवन (ब्रिटन), इंदिरा पी. पी. बोरा -कला (आसाम), मदनसिंग चौहान -कला (छत्तीसगढ), उषा चौमर -सामाजिक कार्य (राजस्थान), लिलबहादूर छेत्री -साहित्य व शिक्षण (आसाम), ललिता आणि सरोजा चिदम्बरम (एकत्र)-कला (तामिळनाडू), डॉ. वजिरा चित्रसेन -कला (श्रीलंका), डॉ. पुरुषोत्तम दधीच-कला (मध्यप्रदेश), उत्सवचरण दास-कला (ओडिशा), प्रा. इंद्र दस्सनायके (मरणोत्तर) -वाङ्मय व शिक्षण (श्रीलंका), एच. एम. देसाई -साहित्य व शिक्षण (गुजरात), मनोहर देवदास -कला (तामिळनाडू), ओईनाम बेम्बेम देवी -क्रीडा (मणिपूर), लिया दिस्कीन -सामाजिक कार्य (ब्राझील), एम. पी. गणेश -क्रीडा (कर्नाटक), डॉ. बंगलोर गंगाधर - औषध (कर्नाटक), डॉ. रमण गंगाखेडकर -विज्ञान व अभियांत्रिकी (महाराष्ट्र), बॅरी गार्डिनर -सार्वजनिक जीवन (ब्रिटन), चेवांग मोटूप गोबा -व्यापार व उद्योग (लदाख), भरत गोयंका -व्यापार व उद्योग (कर्नाटक), याडला गोपालराव -कला (आंध्र प्रदेश), मित्रभानू गौन्तिया -कला (ओडिशा), तुलसी गौडा -सामाजिक कार्य (कर्नाटक), सुजोग के. गुहा -विज्ञान व अभियांत्रिकी (बिहार), हारेकला हजब्बा -सामाजिक कार्य (कर्नाटक), एनामुल हक -पुरातत्व (बांगलादेश), मधु मन्सुरी हसमुख -कला (झारखंड), अब्दूल जब्बार (मरणोत्तर) -सामाजिक कार्य (मध्यप्रदेश), बिमलकुमार जैन -सामाजिक कार्य (बिहार), मीनाक्षी जैन -साहित्य व शिक्षण (दिल्ली), नेमनाथ जैन -व्यापार व उद्योग (मध्यप्रदेश), शांती जैन -कला (बिहार), सुधीर जैन -विज्ञान व अभियांत्रिकी (गुजरात), बेनीचंद्र जमातिया -साहित्य व शिक्षण (त्रिपुरा), के. व्ही. संपतकुमार व विदुषी जयलक्ष्मी के. एस. (एकत्र) -साहित्य व शिक्षण-पत्रकारिता (कर्नाटक), करण जोहर -कला (महाराष्ट्र), लीला जोशी -औषध (मध्यप्रदेश), सरिता जोशी -कला (महाराष्ट्र), सी. कामलोवा -साहित्य व शिक्षण (मिझोराम), डॉ. रवी कन्नन आर. -औषध (आसाम), एकता कपूर -कला (महाराष्ट्र), याझदी नवशिरवान करंजिया -कला (गुजरात), नारायण जे. जोशी कारायल -साहित्य व शिक्षण (गुजरात), डॉ. नरिंदरनाथ खन्ना -औषध (उत्तर प्रदेश), नवीन खन्ना -विज्ञान व अभियांत्रिकी (दिल्ली), एस. पी. कोठारी -साहित्य व शिक्षण (अमेरिका), व्ही. के. मुनुसामी कृष्णापक्थर -कला (पुदुचेरी), एम. के. कुंजोल -सामाजिक कार्य (केरळ), मनमोहन महापात्रा (मरणोत्तर) -कला (ओडिशा), उस्ताद अन्वर खान मंगनीयार -कला (राजस्थान), कट्टुंगल सुब्रमन्यम मनिलाल -विज्ञान व अभियांत्रिकी (केरळ), मुन्ना मास्टर -कला (राजस्थान), प्रा. अभिराज राजेंद्र मिश्रा -साहित्य व शिक्षण (हिमाचल प्रदेश), बिनापनी मोहंती -साहित्य व शिक्षण (ओडिशा), डॉ. अरुणोदय मंडल -औषध (प. बंगाल), डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी -साहित्य व शिक्षण (फ्रान्स), सत्यनारायण मुंदायूर -सामाजिक कार्य (अरुणाचल प्रदेश), मणिलाल नाग -कला (प. बंगाल), एन. चंद्रशेखरन नायर -साहित्य व शिक्षण (केरळ), डॉ. तेत्सू नाकामुरा (मरणोत्तर) -सामाजिक कार्य (अफगाणिस्तान), शिवदत्त निर्मोही -साहित्य व शिक्षण (जम्मू व काश्मीर), पु लालबैकथंगा पाचुआऊ -साहित्य व शिक्षण (मिझोराम), मुझिक्कल पंकजाक्षी -कला (केरळ), डॉ. प्रशांतकुमार पट्टनायक -साहित्य व शिक्षण (अमेरिका), जोगेंद्रनाथ फुकन -साहित्य व शिक्षण (आसाम), राहीबाई सोमा पोपेरे -कृषी (महाराष्ट्र), योगेश प्रवीण -साहित्य व शिक्षण (उत्तर प्रदेश), जितू राय - क्रीडा (उत्तर प्रदेश), तरुणदीप राय - क्रीडा (सिक्कीम), एस. रामकृष्णन- सामाजिक कार्य (तामिळनाडू), रानी रामपाल - क्रीडा (हरयाणा), कंगना रनौत- कला (महाराष्ट्र), दलवई चलपथी राव - कला (आंध्र प्रदेश), शहाबुद्दीन राठोड- साहित्य आणि शिक्षण (गुजरात), कल्याण सिंह रावत - सामाजिक कार्य (उत्तराखंड), चिंतला व्यंकट रेड्डी - कृषी (तेलंगणा), डॉ. शांती रॉय - औषधी (बिहार), राधामोहन आणि साबरमती - कृषी (ओडिशा), बाटाकृष्ण साहो- पशुसंवर्धन (ओडिशा), त्रिण्ती साईओ - कृषी (मेघालय), अदनान सामी - कला (महाराष्ट्र), विजय संकेश्वर- व्यापार (कर्नाटक), डॉ. कुशल कोनवार सरमा - औषधी (आसाम), सय्यद मेहबूब शाह कादरी ऊर्फ सईदभाई- सामाजिक कार्य (महाराष्ट्र), मोहंमद शरीफ- सामाजिक कार्य (उत्तर प्रदेश), श्यामसुंदर शर्मा - कला (बिहार), गुरदीप सिंग- औषधी (गुजरात), रामजी सिंह- सामाजिक कार्य (बिहार), वशिष्ठ नारायण सिंह (मरणोत्तर)-विज्ञान व अभियांत्रिकी (बिहार), दया प्रकाश सिंह- कला (उत्तर प्रदेश), डॉ. सॅण्ड्रा डिसुझा - औषधी (महाराष्ट्र), विजयासारथी श्रीभाष्यम - साहित्य आणि शिक्षण (तेलंगणा), काली शाबी महेबूब व शेख मेहबूब सुबानी-कला (तामिळनाडू), जावेद अहमद टाक- सामाजिक कार्य (जम्मू- काश्मीर), प्रदीप थालापील- विज्ञान आणि अभियांत्रिकी (तामिळनाडू), येशे डोरजी थोंगची- साहित्य आणि शिक्षण (अरुणाचल प्रदेश), रॉबर्ट थुर्मन - साहित्य आणि शिक्षण (अमेरिका) , अगुस इंद्रा उदयाना- सामाजिक कार्य (इंडोनेशिया), हरीशचंद्र वर्मा - विज्ञान आणि अभियांत्रिकी (उ़ प्रदेश), सुंदराम वर्मा- सामाजिक कार्य (राजस्थान), रोमेश टेकचंद वाधवानी - व्यापार (अमेरिका), सुरेश वाडकर - कला (महाराष्ट्र), प्रेम वत्स- व्यापार (कॅनडा).