नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा पाच जणांना पद्मविभूषण, १७ जणांना पद्मभूषण आणि ११० जणांना पद्मश्री देण्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारकडून पाच व्यक्तिमत्त्वांना पद्मविभूषणने सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व्यतिरिक्त, त्यात ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेत्री वैजयंतीमाला, प्रसिद्ध नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, चिरंजीवी आणि बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर) यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील कोणाला मिळाले पुरस्कार?
- श्री होर्मुसजी एन कामा - पद्मभूषण पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
- श्री अश्विन बालचंद मेहता - पद्मभूषण पुरस्कार - वैद्यकीय
- श्री राम नाईक - पद्मभूषण पुरस्कार - सामाजिक कार्य
- श्री दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त - पद्मभूषण पुरस्कार - कला
- श्री कुंदन व्यास - पद्मभूषण पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण - पत्रकारिता
- श्री उदय विश्वनाथ देशपांडे - पद्मश्री पुरस्कार - क्रिडा
- श्री मनोहर कृष्णा डोळे - पद्मश्री पुरस्कार - वैद्यकीय
- श्री जहिर काझी - पद्मश्री पुरस्कार - साहित्य आणि शिक्षण
- श्री चंद्रशेखर महादेवराव मेश्राम - पद्मश्री पुरस्कार - वैद्यकीय
- कल्पना मोरपरिया - पद्मश्री पुरस्कार - व्यापार आणि उद्योग
- श्री शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर - पद्मश्री पुरस्कार - सामाजिक कार्य