नवी दिल्ली - पद्मावत चित्रपटावरून निर्णाण झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. पद्मावतवरून आक्रमक झालेल्या करणी सेनेने आता या चित्रपटाला विरोध करण्यासाठी लष्करातील क्षत्रिय समाजातील जवानांनी अन्नत्याग करावा, असे आवाहन केले आहे. लष्करातील जवानांना आवाहन करताना करणी सेनेचे प्रमुख महिपाल सिंह मकवाना यांनी सांगितले की, सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांनीही राणी पद्मावतीच्या सन्मानाच्या रक्षणार्थ पुढे आले पाहिजे. तुम्ही पद्मावत चित्रपटाच्या विरोधासाठी एक दिवस अन्नत्याग करून लष्करातील मेसमधील जेवणावर बहिष्कार टाका" 'पद्मावत' चित्रपट प्रदर्शित होऊ नये, यासाठी राजपूत करणी सेना व काही भाजपाशासित राज्ये प्रयत्न करीत असून, राजस्थान सरकारने चित्रपटाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर २५ जानेवारी रोजी भारत बंद करण्याची घोषणा राजपूत करणी सेनेने केली आहे. त्याच दिवशी हा चित्रपट देशभरात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.करणी सेनेने सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसुन जोशी यांना जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये येऊ देणार नाही आणि भन्साळी यांच्या एकाही चित्रपटाचे चित्रिकरण राजस्थानात होऊ देणार नाही, अशी धमकीच दिली आहे. पद्मावतच्या प्रदर्शनास परवानगी देणाºयांना व समर्थन करणाºयांना आम्ही जयपूरमध्ये प्रवेश करू देणारनाही, असे करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह म्हणाले.पद्मावतच्या निर्मात्यांची बाजू सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांनाही करणी सेनेच्या नावाने धमकी आली आहे. एका अज्ञात इसमाने त्यांच्या कार्यालयात फोन करून, पद्मावतच्या बाजूने बोलू नका, अशी धमकी दिली असून, त्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. मेवाडच्या राजघराण्यातील महाराज महेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना पत्र लिहून, चित्रपटाचे इतिहासाचे विकृत चित्रण केले आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात यावी आणि राज्यात हिंसाचार टाळावा, अशी विनंती केली आहे.दरम्यान पद्मावतसाठी अभिनेता अक्षयकुमार याने आपल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे, असे सांगण्यात येते. (वृत्तसंस्था)
बंदीसाठी प्रयत्न सुरूचराजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ‘पद्मावत’ चित्रपटावर बंदी घालण्याची इच्छा आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून, ते चित्रपटावर बंदी घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे थिएटर मालकांनीच तो प्रदर्शित करू नये, असे प्रयत्न काही राज्य सरकारांतर्फे सुरू असल्याचे कळते. गुजरातमधील मल्टीप्लेक्स मालकांच्या संघटनेने आम्ही पद्मावत दाखवणार नाही, असे जाहीर केले आहे.