पान 2 -क्राईम ब्रँचचे वरातीमागून घोडे चर्चिलच्या घरावरील छापा प्रकरण
By admin | Published: August 12, 2015 11:54 PM2015-08-12T23:54:36+5:302015-08-12T23:54:36+5:30
मडगाव : जैका लाचखोरी प्रकरणात क्राईम ब्रँचच्या अटकेत असलेले चर्चिल आलेमाव यांच्या घरावर सहा दिवसांच्या विलंबाने मंगळवारी घातलेला छापा म्हणजे क्राईम ब्रँचने वराती मागून आणलेले घोडे, अशी संभावना केली जाते. छापा घालण्याची ही कृती केवळ डोळय़ांना पाणी लावण्यापुरती, अशीच प्रतिक्रिया पोलीस व वकिलांच्या वतरुळातून व्यक्त केली जाते.
Next
म गाव : जैका लाचखोरी प्रकरणात क्राईम ब्रँचच्या अटकेत असलेले चर्चिल आलेमाव यांच्या घरावर सहा दिवसांच्या विलंबाने मंगळवारी घातलेला छापा म्हणजे क्राईम ब्रँचने वराती मागून आणलेले घोडे, अशी संभावना केली जाते. छापा घालण्याची ही कृती केवळ डोळय़ांना पाणी लावण्यापुरती, अशीच प्रतिक्रिया पोलीस व वकिलांच्या वतरुळातून व्यक्त केली जाते.जैका लाचखोरी प्रकरणात सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना क्राईम ब्रँचने 5 ऑगस्ट रोजी अटक केली होती. त्यानंतर तब्बल सात दिवसांनी मंगळवारी वार्का येथील त्यांच्या घरावर व कार्यालयावर क्राईम ब्रँचने छापा घातला. वास्तविक अशा प्रकरणात ज्या दिवशी अटक होते त्याचदिवशी छापा टाकला जातो. जेणेकरून आरोपीला कुठलेही पुरावे नष्ट करता येणे शक्य नसते; पण क्राईम ब्रँचने चर्चिलच्या बाबतीत भलतीच सुस्ताई दाखवली असे म्हणावे लागेल.या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ वकील क्लिओफात कुतिन्हो म्हणाले, ‘ही कारवाई केवळ डोळ्यांना पाणी लावण्यापुरती होती. आपण गोत्यात येईन अशा प्रकारची फाईल कुठलाही मूर्ख आपल्या घरी किंवा कार्यालयात ठेवणार नाही. चर्चिल आलेमाव तेवढे मूर्ख नक्कीच नाहीत. क्राईम ब्रँचही ही कारवाई म्हणजे आपण काहीतरी केले हे कोर्टाला दाखविण्याचा प्रयत्न, असे ते म्हणाले. अँड. आयरिश रॉड्रिग्स यांनी या संपूर्ण चौकशीबद्दलच शंका उपस्थित करताना क्राईम ब्रँचकडे चांगले अधिकारी असताना उभे आयुष्य गोवा राखीव दलात किंवा रेल्वे पोलिसात व्यतित केलेल्या दत्तगुरू सावंत या निरीक्षकाकडे हे प्रकरण का दिले तेच कळत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. निरीक्षक दत्तगुरू सावंत हे भाजपासाठी केवळ ‘येस मॅन’ असून त्यांच्याकडे ही चौकशी देण्यामागचे ही त्यांची एकमेव पात्रता, असे ते म्हणाले. अशा प्रकारचे तपास अधिकारी असल्यावर अशी दिरंगाई झाल्यास त्यात फारसे काही नवल नाही, असे ते म्हणाले.ज्येष्ठ वकील अँड. राधाराव ग्रासियस यांनीही ही कारवाई म्हणजे केवळ फार्स, अशी संभावना केली. ग्रासियस म्हणाले, कुठल्याही आरोपीने कुठल्याही प्रकरणातील पुरावे नष्ट करू नयेत यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न होणे आवश्यक असते. क्राईम ब्रँचला जर चर्चिल यांना पुरावे नष्ट करण्याची संधी द्यायची नव्हती, तर ज्या दिवशी त्यांच्यावर चौकशीचे समन्स बजावण्यात आले होते त्याच दिवशी छापा टाकणे आवश्यक होते; पण तब्बल 15 दिवस क्राईम ब्रँचने कुठलीही हालचाल केली नाही. यावरून चर्चिलकडे अशा प्रकारची कुठलीही फाईल नाही याची क्राईम ब्रँचला खात्री होती, असे वाटते. मात्र, चर्चिल यांचे वकील अशोक मुंडरगी यांनी खास न्यायालयात क्राईम ब्रँचने कुठलेही प्रयत्न केले नाहीत, असा दावा केल्यामुळेच आता आम्ही काहीतरी केले हे दाखविण्याचाच हा प्रयत्न होता असे वाटते, असे ते म्हणाले.निवृत्त पोलीस अधीक्षक विष्णूदास वेर्णेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना, ‘पोलिसांचे नेहमीचे डावपेच असून त्यात आश्चर्य वाटण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही,’ असे ते म्हणाले. आता चर्चिलचा रिमांड वाढवून घ्यायचे असेल तर पोलिसांना त्यांनी काहीतरी प्रयत्न केले हे कोर्टासमोर आणण्याची गरज आहे. चर्चिलच्या घरावरील छापा हा त्यासाठीच होता यात शंका नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)चौकटपोलिसांची इभ्रत वेशीवर : संतोबाजैका लाचखोरी प्रकरणात गोव्याच्या पोलिसांनी ज्या तर्हेने तपास केला आहे आणि ज्या तर्हेने चर्चिल आलेमाव यांना अटक करण्यात आली आहे ते पाहिल्यास गोवा पोलिसांनी आपली इभ्रतच वेशीवर टांगली आहे, अशी वाटण्याजोगी परिस्थिती आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया निवृत्त पोलीस उपअधीक्षक संतोबा देसाई यांनी व्यक्त केली.या प्रकरणात पोलिसांना अधिक कणखरता दाखवता आली असती, असे ते म्हणाले. चर्चिल आलेमाव यांना अटक केल्यानंतर तब्बल सात दिवसांनी त्यांच्या घरावर पोलिसांनी जो छापा टाकला आहे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना ही तर कुचकामी कारवाई, असे ते म्हणाले. अशा प्रकारामुळे पोलिसांची केस कणखर न होता ती ढेपाळण्याचीच शक्यता अधिक असते, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.1990 साली आलेमाव यांना कॉफेपोसाखाली अटक करण्यात आली होती. त्या वेळी कारवाई संतोबा देसाई यांनीच केली होती. त्या वेळी ते मडगावचे उपअधीक्षक होते. चर्चिल आलेमाव यांना अटक करण्यापूर्वी त्यांचे भाऊ ज्योकिम आलेमाव आणि सियाब्र आलेमाव यांना रात्रीच्यावेळी वार्के येथे जाऊन अटक करण्यामागेही देसाई यांचाच हात होता.आलेमाव यांना आगशी येथे बोलवून क्राईम ब्रँचच्या अधिकार्यांनी अटक केली. त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करताना देसाई म्हणाले, वार्के येथे चर्चिल आलेमाव यांच्या घरी जाऊन त्यांना अटक करण्यास गोवा पोलीस भीत होते का? आलेमाव यांना रात्रीच्यावेळी अटक करण्यात आली याबद्दल सध्या टीका होत आहे. यावर बोलताना देसाई म्हणाले, कुठल्याही प्रकरणात जर एफआयआर नोंद झाला आणि त्या गुन्?ात कुठलीही व्यक्ती सहभागी असल्याचा संशय असला तर त्याला केवळ दिवसाच अटक व्हायला असे नाही तर रात्रीच्यावेळीही अटक करता येते आणि यासाठी कोर्टाच्या वॉरन्टचीही गरज नाही, असे ते म्हणाले.कित्येकवेळा रात्रीच्यावेळी झडती घेण्यासाठी न्यायालयाच्या वॉरन्टची गरज असते असा गैरसमज लोकांमध्ये आहे. मात्र, अशा वॉरन्टची कसलीही गरज नाही. कुठल्याही संशयिताच्या घरावर कुठल्याहीवेळी छापा घालण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. आणि त्यांना असे करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. मात्र, अशा कारवाईच्यावेळी पोलिसांनी कुठलाही अश्लाघ्य प्रकार करू नये, अशी अपेक्षा असते. आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया त्यांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षा असते. ही कारवाई केल्यानंतर केवळ त्याचा अहवाल न्यायालयाला पाठवायचा असतो, असे ते म्हणाले.ढँ3 : 1208-टअफ-02कॅप्शन: संतोबा देसाई