पुंछ-रावलकोट मार्गावर चालणारी राह-ए-अमन बससेवा स्थगित, पाकिस्तानकडून एलओसीवर गेट बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:11 PM2019-03-04T19:11:23+5:302019-03-04T19:22:09+5:30
पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली
जम्मू - पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली. नियोजनानुसार सोमवारी दुपारी पुंछवरून रावलकोटसाठी ही बस धावली, मात्र पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने ही सेवा रद्द करण्यात आली.
सोमवारी रावलकोटला जाण्यासाठी पुंछला पाकव्याप्त काश्मीरचे रहिवाशी सैय्यद बुखारी पोहचले मात्र त्यांना तिकीट खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याने पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने आजची बससेवा रद्द केल्याची माहिती दिली त्यानंतर अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
Resident of Mirpur(PoK) Syed Bukhari on Cross LoC Poonch-Rawalkot bus service: I was going back, went to the border, bought tickets but was told that the Pakistan authorities did not open the gate today, then we had to come back. pic.twitter.com/83nM3MhdC6
— ANI (@ANI) March 4, 2019
एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान शांततेसाठी भारताने चर्चा करावी अशी वक्तव्य करत असले तरी दुसरीकडे या दोन्ही देशांमध्ये असणाऱ्या प्रवाशी सेवा रोखण्यात येत आहेत.
2006 मध्ये सुरू झाली होती बससेवा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध राहवेत यासाठी 2006 मध्ये पुंछ-रावलकोट दरम्यान ही बससेवा सुरू केली होती. ज्या ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली अशा वेळी ही बससेवा रद्द करण्यात आली होती.