जम्मू - पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली. नियोजनानुसार सोमवारी दुपारी पुंछवरून रावलकोटसाठी ही बस धावली, मात्र पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने ही सेवा रद्द करण्यात आली. सोमवारी रावलकोटला जाण्यासाठी पुंछला पाकव्याप्त काश्मीरचे रहिवाशी सैय्यद बुखारी पोहचले मात्र त्यांना तिकीट खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्याने पाकिस्तानकडून एलओसीवर गेट न उघडल्याने आजची बससेवा रद्द केल्याची माहिती दिली त्यानंतर अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
2006 मध्ये सुरू झाली होती बससेवा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सलोख्याचे संबंध राहवेत यासाठी 2006 मध्ये पुंछ-रावलकोट दरम्यान ही बससेवा सुरू केली होती. ज्या ज्या वेळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणावाची स्थिती निर्माण झाली अशा वेळी ही बससेवा रद्द करण्यात आली होती.