पाकचा गोळीबार; ५ रहिवाशांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:04 AM2018-05-24T00:04:18+5:302018-05-24T00:04:18+5:30
नागरिक म्हणतात, मोदींनी आता युद्धच छेडावे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळीबार कधीच झाला नव्हता
जम्मू : पाकिस्तानने जम्मूजवळील नियंत्रण रेषेवर मंगळवार रात्रीपासून सुरू केलेल्या गोळीबार, तोफमाऱ्यांत पाच रहिवाशांचा मृत्यू झाला. तेथील किमान १00 गावे ताबडतोब रिकामी करण्यात आली आहे. त्या भागांतील सर्व शाळा बंद करण्यात आल्या असून, रहिवाशांना अन्यत्र हलविण्याचे काम सुरू केले आहे.
पाक सैनिकांनी बुधवारी कथुआ जिल्ह्यातील हिरानगर सीमेवर गोळीबार सुरू केला. त्यात रामपाल नावाचा रहिवासी मरण पावला. मृतांमध्ये हिरानगर सेक्टरमधील लोदी गावातीन तीन जण असून, एक रहिवासी अरनिया सेक्टरमधील रहिवासी आहे. काल रात्रीपासूनच्या पाक हल्ल्यातील मृतांची संख्या पाच झाली असून, काल सकाळीही एक आठ महिन्यांचे मूल मरण पावले होते. सोमवारी एक महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पाक दुतावासातील अधिकाºयाला परराष्टÑ खात्याने बोलावून गंभीर समज दिली. ‘गेल्या ९ दिवसांत पाकच्या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या १0 झाली आहे. २ जवानही शहीद झाले. (वृत्तसंस्था)
बीएसएफच्या ४0 चौक्यांवर गोळीबार, तोफांचा मारा
पाकिस्तानने बीएसएफच्या जवळपास ४0 चौक्यांना लक्ष्य केले असून, गोळीबाराबरोबरच सीमेपलिकडून तोफांचा माराही सुरू आहे.
गोळीबार व तोफमारा यांमुळे सीमेवरील गावांतील अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तर काही घरी आता राहण्यायोग्य राहिलेलीच नाहीत.
या प्रकारामुळे नियंत्रण रेषेवरील गावांमध्ये प्रचंड घबराट उडाली आहे. सुमारे १00 गावांतील लोकांना पोलीस व सशस्त्र दलांच्या मदतीने सुरक्षित छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
आक्रमकपणे प्रत्युत्तर द्या
पाकिस्तानच्या हल्ल्यांना त्याहून अधिक आक्रमकपणे उत्तर द्या, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारीच बीएसफएफच्या जवानांना दिल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी हल्ल्याची तीव्रता वाढवली आहे. तीन दिवसांपूर्वी बीएसएफने पाकच्या अनेक चौक्या पार उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी आता हल्ले थांबवा, अशी गयावया बीएसएफला केली होती. पण स्वत: मात्र गोळीबार थांबवला नाही.
खोºयात अतिरेकी हल्ला
श्रीनगर : अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरामध्ये आज सकाळी दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला. त्यात सहा स्थानिक रहिवासी जखमी झाले असून, त्यात एक महिला आहे. अतिरेक्यांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकला. मात्र तो दुसरीकडे पडून त्याचा स्फोट झाला. तेथून जाणारे सहा रहिवासी त्यामुळे जखमी झाले. ग्रेनेड फेकून दहशतवादी पळून गेले. चवान त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून मंगळवारी रात्रीपासून हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया व आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू आहे. सरकारी व खासगी अशा सर्व शाळा बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत आहे. यावर्षी अनेकदा शाळा बंद कराव्या लागल्या आहेत.