कुरापती पाकिस्तानकडून सीमारेषेवर तोफगोळ्यांचा मारा, आजही शाळा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 07:58 AM2018-05-23T07:58:17+5:302018-05-23T09:35:13+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार हल्ला करण्यात येत आहे. यामुळे सीमारेषेवर तणाव निर्माण झाला आहे. मंगळवारी (22 मे) रात्रीदेखील पाकिस्ताननं कथुआ जिल्ह्यातील आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्ताननं बीएसएफच्या जवळपास 40 चौक्यांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हीरानगर सेक्टरमधील लोंदी गाव व अरनिया सेक्टरमधील नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून रात्री उशिरापर्यंत हीरानगर, सांबा, रामगड, अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कुरापती पाकिस्तानकडून वारंवार सुरू असलेल्या गोळीबार आणि तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व सरकारी तसंच खासगी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
Ceasefire violation by Pakistan continues in Jammu district's RS Pora. #JammuAndKashmirpic.twitter.com/L36fQPkwSe
— ANI (@ANI) May 23, 2018
One dead, two injured after heavy shelling from Pakistan in Kathua's Hiranagar sector. #JammuAndKashmirpic.twitter.com/AoX19bBEHN
— ANI (@ANI) May 23, 2018
One more civilian has been injured in ceasefire violation by Pakistan in Arnia Sector. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) May 23, 2018
#JammuAndKashmir: Pakistan violated ceasefire in Hiranagar, Samba, Ramgarh, Arnia and Suchetgarh sectors of Jammu. BSF retaliating. More details awaited. pic.twitter.com/H9GM2fCpPK
— ANI (@ANI) May 22, 2018
दरम्यान, पाकिस्ताननं अरनिया सेक्टरमध्ये सोमवारी (21मे) रात्रभर उफळी तोफांचा मारासुद्धा केला. या हल्ल्यात आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. रविवारपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता. अरनियातील त्रेवा गावाला पाकिस्तानी रेंजर्सनी लक्ष्य केले. तिथे सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. रविवारी (20 मे) पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार थांबवा, अशी गयावया केल्यानंतर बीएसएफने सीमारेषेवर गोळीबार हल्ले थांबवले. पण त्यानंतर काही तासांतच पाकिस्तानाने आपला खरा चेहरा दाखवला व प्रामुख्याने भारतातील नागरी वस्त्या व गावांवर हल्ले सुरू केले. पाकिस्तानने रविवारी जम्मूतील सांबा सेक्टरच्या बाबा चमिलियाल तसेच नारायणपुरा भागातून जाणा-या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ गोळीबार केला.