पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 04:37 PM2019-08-26T16:37:29+5:302019-08-26T16:49:03+5:30

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत.

Pakistan Flows Dirty Water In Sutlej At Punjab Many Villeges Affecte | पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

पाकच्या नापाक कुरापती! भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी सतलज नदीत सोडलं दूषित पाणी

Next

चंदीगड - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध विकोपाला गेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर काश्मीर प्रकरणी पाकिस्तान एकटा पडल्याने पाक सैरभैर झाला आहे. त्यामुळे भारतीयांना नुकसान पोहचविण्यासाठी पाकिस्तान नापाक कुरापती करत असल्याचं समोर येत आहे. 

पाकिस्तानलगत असणाऱ्या पंजाब प्रांतातील नदीत हजारो लीटर दूषित पाणी सोडलं जात असून त्यामुळे पाण्याची पातळी वाढून भारतातील पंजाब काही बंधारे तुटले आहेत. तसेच दूषित पाण्यामुळे सीमेवरील अनेक गावांमध्ये आजाराने थैमान घातलं आहे. पाकिस्तानकडून अचानक जास्तीचं पाणी सोडल्यामुळे पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सतलज नदी भारतात येण्यापूर्वी पंजाबच्या काही भागातून पाकिस्तानात जाते. त्यानंतर पुन्हा भारतात प्रवेश करते. पाकिस्तानने या सतलुज नदीत प्रदुषित पाणी सोडण्यात सुरूवात केली आहे. त्यामुळे हजारो भारतीय शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान आणि आरोग्याची हानी होत आहे. 

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी सतलुज नदीतील पाण्याची पातळी वाढल्याबद्दल परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी रविवारी लष्करासोबत बैठक घेऊन नदीवरील तटबंध मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. फिरोजपूर जिल्ह्यातील गावांना दूषित पाण्याचा फटका बसला आहे. जीवघेणे आजारांनी गावकऱ्यांना त्रस्त केलं आहे. 

सीएम अमरिंदर सिंग यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन सतर्क राहण्याचे निर्देश दिलेत. त्याचसोबत फिरोजपूर येथे एनडीआरएफ टीमला तैनात राहण्यास सांगितले आहे. गावकऱ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टरांचे पथकही पूरग्रस्त भागात आहे. 

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला जगभरातील कोणत्याही देशाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने पाकचा थयथयाट समोर येऊ लागला आहे. अथक प्रयत्नानंतरही चीन, तुर्कीसारखे देशही पाकिस्तानच्या मागे उभे राहताना दिसत नसल्याने हताश झालेला पाकने धर्माच्या नावावर जगातील अन्य देशांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबत व्यापार बंद केला आहे. तसेच समझौता एक्सप्रेसही रद्द केली आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारताला नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. 
 

Web Title: Pakistan Flows Dirty Water In Sutlej At Punjab Many Villeges Affecte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.