श्रीनगर - उत्तर प्रदेशमधील भाजपा नेते रणजीत कुमार श्रीवास्तव यांच्या विधानाचा संदर्भ देऊन भाजपावर प्रहार करताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले. उत्तर प्रदेशात भाजपाचे नेते मुस्लिमांना धमकी देतात. मत आम्हालाच द्या अन्यथा दाखवून देऊ. भाजपाच्या नेत्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी, भारत हा तुमच्या बापाचा नाही.
भारत देश सर्वांचा आहे. हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन प्रत्येकाचा हा देश आहे. कोणाला मतदान करायचे हे ठरवण्याचा अधिकार हा त्यांचा आहे. तुम्ही जबरदस्ती करु शकत नाही. तुम्ही एक पाकिस्तान तयार केला. आणखी किती पाकिस्तान बनवणार याचा एकदा विचार करा. भारताचे आणखी किती तुकडे करणार. कुठे कुठे तुकडे करणार असा सवाल त्यांनी विचारला.
जम्मूमध्ये एका सभेमध्ये ते बोलत होते. हो, पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा आहे हे मी बोललो, त्यांनी हातात बांगडया भरलेल्या नाहीत. त्यांच्याकडेही अॅटम बॉम्ब आहे. त्यांच्या हातून आम्ही मरावे अशी तुमची इच्छा आहे का ? तुम्ही राजवाडयात बसला आहात. सीमा रेषेवर राहणा-या गरीबांचा विचार करा. त्यांच्यावर रोज बॉम्ब पडतो असे अब्दुल्ला म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाहीपाकव्याप्त काश्मीर भारताच्या बापाचे नाही, असे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ असलेल्या उरी येथे एका कार्यक्रमात अब्दुल्ला म्हणाले, "कधीपर्यंत निरपराध लोकांच्या रक्ताचे पाट वाहत राहणार आणि कधीपर्यंत आम्ही पाकव्याप्त काश्मीर आमचे आहे म्हणून सांगत राहणार. काश्मीर यांच्या बापाचे नाही आहे."
"काश्मीरची विभागणी होऊन 70 वर्षे झाली. नियंत्रण रेषेपलिकडे पाकिस्तान आहे आणि हे हिंदुस्तान आहे. 70 वर्षांत तो भाग हे परत मिळवू शकलेले नाहीत. तरीही आता पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग आहे म्हणून सांगताहेत,"असेही अब्दुल्ला पुढे म्हणाले.