नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिलेल्या मदतीच्या ऑफरची भारतानं खिल्ली उडवली आहे. भारतातील 34 टक्के घर विनामदतीशिवाय 1 आठवडेही जगू शकत नाहीत. मी भारताला मदत करून आमच्या ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहोचवू शकतो, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्याचा आता भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव खरपूस समाचार घेतला आहे. अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्यावर एकूण जीडीपीच्या 90 टक्के कर्ज आहे.भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले होते की, भारताच्या 34 टक्के कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्हाला त्यांची मदत करायची आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान सरकारला आरसा दाखवला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 कोटी कुटुंबांपर्यंत नऊ आठवड्यांत 120 अब्ज रुपये यशस्वीपणे पोहोचविल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे.
हेही वाचा
...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी
आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट
चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'
...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार
51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार