Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 05:08 PM2018-06-27T17:08:24+5:302018-06-27T17:10:49+5:30
माजी लष्करी अधिकाऱ्यानं शेयर केला पाकिस्तानी लष्कराचा क्रूरपणा दाखवणारा व्हिडीओ
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकार हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं संयुक्त राष्ट्रानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. यानंतर भारतीय सुरक्षा दलातून मेजर पदावरुन निवृत्त झालेल्या सुरेंद्र पुनिया यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा क्रूरपणा स्पष्ट दिसून येत आहे. पाकिस्तानी सैनिक काही नागरिकांच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना फरफटत नेत लाथांनी मारहाण करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.
संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्तांनी पाकिस्तानी सैन्याच्या क्रूरतेचा व्हिडीओ पाहावा, असं सुरेंद्र पुनिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानचे सैनिक पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानमध्ये कशाप्रकारे मानवाधिकारांचं उल्लंघन करतात, हे संयुक्त राष्ट्रानं एकदा पाहावं, असं आवाहन पुनिया यांनी केलं आहे. मेजर पदावरुन सेवानिवृत्त झालेले पुनिया राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त अधिकारी आहेत.
Rather than dealing with terror state Pak which violate human rights on daily basis in Balochistan & PoK,UNHRC obsessively focuses on J&K where world’s most ethical/humane army operates against terrorists@UNHumanRights Ur org & Zeid Al Hussein must watch what Pak army is doing👇 pic.twitter.com/mBiUMVySeP
— Maj Surendra Poonia (@MajorPoonia) June 27, 2018
'संयुक्त राष्ट्रानं मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा अहवाल तयार करताना जम्मू-काश्मीरवर जास्त लक्ष केंद्र केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचा सन्मान करणारं लष्कर तैनात आहे. नागरिकांची सर्व प्रकारे काळजी घेऊन हे लष्कर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करतं,' असं पुनिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंना मानवाधिकाराचं उल्लंघन होतं. या प्रकरणांचा आंतरराष्ट्रीय तपास व्हायला हवा,' असं संयुक्त राष्ट्रानं 49 पानांच्या अहवालात म्हटलं आहे.