जम्मू : पाकिस्तानी रेंजर्सनी युद्धबंदीचे उल्लंघन करीत जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवरील अग्रिम चौक्या तसेच गावांवर गोळीबार केला. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकच्या हल्ल्यात भारतीय बाजूने कसलेही नुकसान झालेले नाही. हिरानगर सेक्टरच्या चंदवा, मयारी व फकिरामध्ये शुक्रवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी सुरू झालेला गोळीबार शनिवारी पहाटे ४.१५ वाजेनंतरही सुरू होता.
जम्मू-काश्मीरच्या कथुआमध्ये पाकिस्तानचा गोळीबार, भारताकडून चोख प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 2:11 AM