जम्मू : काश्मीरच्या नागरी वस्त्यांवर व लष्करी चौक्यांवर तीन दिवस पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर दिल्यानंतर घाबरून जाऊन, आता आमच्यावरील हल्ले थांबवा, अशी गयावया करणाºया पाक सैन्याची खुमखुमी अद्याप संपलेली नाही. गोळीबार थांबवण्याची विनवणी बीएसएफला करणाºया पाकिस्तानी रेंजर्सनी पुन्हा भारतीय नागरी वस्त्यांमध्ये तोफांचा मारा व गोळीबार सुरू केला असून, त्यात काही रहिवासी जखमी झाले आहेत.अर्थातच भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी रेंजर्सचे ४ ते ६ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानने त्याला दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानातील अनेक लष्करी चौक्या भारतीय जवानाने पार नष्ट करून टाकल्या आहेत.अरनियातीर त्रेवा गावाला पाकिस्तानी रेंजर्सनी लक्ष्य केले. तिथे सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काल पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार थांबवा, अशी गयावया केल्यानंतर बीएसएफने सीमारेषेवर गोळीबार बंद केला होता. पण त्यानंतर काही तासांतच पाकने आपला खरा चेहरा दाखवला व प्रामुख्याने भारतातील नागरी वस्त्या व गावांवर हल्ले सुरू केले. पाकने रविवारी जम्मूतील सांबा सेक्टरच्या बाबा चमिलियाल तसेच नारायणपुरा भागातून जाणाºया आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ गोळीबार केला.सध्या पाककडून तोफांचा मारा सुरू आहे. त्यामुळे त्याच भाषेत भारतीय जवानही त्यांना उत्तर देत आहेत. त्यात पाकिस्तानचे ४ ते सहा सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच पाक लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. शाळा बंद, लोक घराच्या आतपाकने आपला नापाक चेहरा दाखवत असून, गोळीबार व तोफांचा मारा थांबवायला तयार नाही. त्यामुळे बीएसएफ व स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ंशिवाय त्या परिसरातील शाळादेखील बंद ठेवल्या आहेत.पोलीस चौकीवर हल्लापाकिस्तानच्या कागाळ्या सुरू असतानाच काश्मीर खोºयातील पुलवामा जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर काही अतिरेक्यांनी सोमवारी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना लगेच गोळीबाराने उत्तर दिले. अतिरेकी पळून गेले असून, त्यांचा शोध जारी आहे. या हल्ल्यात कसलेही नुकसान झालेले नाही.
गयावया करणाऱ्या पाकिस्तानची पुन्हा मस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 1:51 AM