पान १- जोड बिहार पवारांचे तिसर्या आघाडीशी हितगुज
By admin | Published: August 12, 2015 11:54 PM
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी काँग्रेस आणि भाजपा वगळता उर्वरित पक्षांच्या नेत्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. काँग्रेसेतर आणि भाजपेतर पक्षांचा तिसरा पर्याय तयार करण्याची त्यांची इच्छा असल्याची जोरदार चर्चा असली तरी बिहारच्या महाआघाडीत स्थान मिळविणे हा त्यामागील अंतस्थ हेतू असल्याचा होरा आहे. सध्या नितिश-लालू यांच्या आघाडीने राष्ट्रवादीला एकही जागा सोडलेली नाही. पवारांनी बोलावलेल्या बैठकीत समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सहभागी झाले. आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आश्वासनानंतरही बैठकीला आले नाहीत. पण मुलायमसिंग यादव यांच्याशिवाय रामकृपाल यादव, संजदचे शरद यादव, के.सी. त्यागी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, नॅशनल
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी काँग्रेस आणि भाजपा वगळता उर्वरित पक्षांच्या नेत्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. काँग्रेसेतर आणि भाजपेतर पक्षांचा तिसरा पर्याय तयार करण्याची त्यांची इच्छा असल्याची जोरदार चर्चा असली तरी बिहारच्या महाआघाडीत स्थान मिळविणे हा त्यामागील अंतस्थ हेतू असल्याचा होरा आहे. सध्या नितिश-लालू यांच्या आघाडीने राष्ट्रवादीला एकही जागा सोडलेली नाही. पवारांनी बोलावलेल्या बैठकीत समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल, तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सहभागी झाले. आम आदमी पार्टीचे (आप) नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आश्वासनानंतरही बैठकीला आले नाहीत. पण मुलायमसिंग यादव यांच्याशिवाय रामकृपाल यादव, संजदचे शरद यादव, के.सी. त्यागी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, राकाँचे प्रफुल्ल पटेल आणि तारिक अन्वर उपस्थित होते. येत्या २२ सप्टेंबरला यासंदर्भात आणखी एक बैठक होणार असून बिजू जनता दलही त्यात सहभागी होईल, असा अंदाज आहे.