पणजी निवडणूक (फुर्तादोंचा फोटो घेणे)
By admin | Published: January 31, 2015 12:34 AM2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30
केवळ दोन वर्षे द्या : फुर्तादो
Next
क वळ दोन वर्षे द्या : फुर्तादो- स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थ काम हीच शिदोरी पणजी : पर्रीकरांना २0 वर्षे दिली, आपल्याला केवळ दोन वर्षे द्या आणि कसोटीला उतरलो नाही तर पुन: निवडून आणू नका, अशी हाक कॉँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांनी पणजीवासियांना दिली आहे. काँग्रेसची दशा झालेली असताना या पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरण्याचे धाडस तुम्ही कसे काय केले, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. धर्मनिरपेक्षतेला मी प्राधान्य देतो. काँग्रेसच्या मंत्री, आमदारांनी किंवा अन्य नेत्यांनी भूतकाळात काय केले याची पर्वा मला नाही. माझे स्वच्छ चारित्र्य पणजीवासीयच नव्हे, तर गोमंतकीय जाणून आहेत. काँग्रेस आता नव्या चेहर्यांना संधी देत असून पक्षाला निश्चितच चांगले दिवस येणार आहेत. या निवडणुकीत तुमची जमेची बाजू कोणती, असे विचारता फुर्तादो म्हणाले की, महापालिकेत आपण केलेले काम सर्वश्रूत आहे. जवाहरलाल नेहरू शहर पुननिर्माण योजनेखाली केंद्राकडून ९0 कोटी, सांतइनेज नाल्यासाठी १९ कोटी, इ-गव्हर्नन्ससाठी २0 कोटी रुपये आणले. गेली २५ वर्षे महापालिकेत निस्वार्थपणे केलेल्या कामाबद्दल शहरवासियांना जाणीव आहे. चारित्र्य स्वच्छ राखून कोणतीही अपेक्षा न बाळगता काम केलेले आहे. सीएसआरखाली कंपन्यांकडून पुरस्कृत करून १0 ट्रक, १ शववाहिका मनपासाठी आणली. गवत कापण्याची १५ यंत्रे, १५ एसी, १२ प्रुनर्स आणले. मनपाच्या सभागृहाची रंगरंगोटी करून घेतली. काँग्रेसच्या तिकिटावर तुम्ही रिंगणात आहात; परंतु पक्षाचे आमदार किंवा नेते प्रचारात सोबत दिसत नाहीत, याचे कारण काय? बाहेरून प्रचारासाठी कोणी आलेले तुम्हाला नकोय, अशीही चर्चा आहे. खरे काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, आपण कोणाही काँग्रेसी आमदार किंवा नेत्याला येऊ नका, असे सांगितलेले नाही. उलट प्रत्येक आमदाराकडे आता बूथ वाटून दिलेले असून पक्षाचे आमदार आणि पदाधिकारी निश्चितपणे आपल्यासाठी वावरतील. येत्या काही दिवसांत ते प्रत्यक्ष फिल्डवरही दिसतील. समाजकार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांनी तुम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. अजून कोणी समर्थन देण्यासाठी पुढे आले आहेत का, असे विचारता काहीजण उघडपणे बोलत नाहीत; परंतु छुपा पाठिंबा देत आहेत. चाौैकट.... कॅसिनोविषयी भूमिका स्पष्टजाहीरनाम्यात कॅसिनांेचा उल्लेख नाही. कॅसिनोंबद्दल तुमची नेमकी भूमिका काय, असा प्रश्न केला असता महापौर म्हणून वेळोवेळी मी याबाबतीत माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे, असे त्यांनी सांगितले. कॅसिनो भाजपच्या पाठिंब्यावर सार्दिनचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी आणले. आम्ही आमची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट केली आहे, असे फुर्तादो म्हणाले; परंतु या प्रश्नावर अधिक काही बोलण्याचे त्यांनी टाळले. (प्रतिनिधी)