नवी दिल्लीः मुलं मोठी झाली आहेत, याचा स्वीकार करा, मुलं दोन-तीन वर्षांची असताना त्यांना मदत करण्याची जी भावना होती, ती कायम ठेवा, मुलांना आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पालकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममधल्या विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांबरोबर 'परीक्षा पे चर्चा 2020 (Pariksha Pe Charcha 2020 LIVE)' या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.जेवढं जास्त तुम्ही आपल्या पाल्याला प्रेरणा द्याल, तेवढाच त्याचा चांगला परिमाण येईल. जेवढा दबाव टाकाल, तेवढ्याच समस्या त्याच्यासाठी निर्माण होतील. आता आई-वडील आणि शिक्षकांनी काय निवडायचं आहे ते ठरवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलांनाही काही सूचना केल्या आहेत. तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करता. त्यावेळी तुमचं डोकं तंदुरुस्त असतं. पण प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य असते.
आवडीच्या क्षेत्रात मुलांना प्रगती करण्यासाठी प्रोत्साहन द्या, मोदींचं पालकांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 1:32 PM