Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस अदानी मुद्द्यावरून सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध मुद्द्यांवरुन सरकार आणि विरोधकांमध्ये दररोज खडाजंगी पाहायला मिळत आहे. विरोधक संसदेबाहेरही रोज नवनव्या पद्धतीने आंदोलन करताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
आजही काँग्रेसचे अनेक नेते आंदोलन करत होते. याअंतर्गत काँग्रेस नेते एनडीएच्या प्रत्येक खासदार आणि मंत्र्यांना एक गुलाब आणि तिरंगा झेंडा देत आहेत. यावेळी राहुल गांधींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही तिरंगा झेंडा देण्याचा प्रयत्न केला, पण राजनाथ सिंह पुढे निघून गेले.
संसदेत काय घडले?राजनाथ सिंह आपल्या गाडीतून खाली उतरताच राहुल गांधी त्यांच्याजवळ आले अन् त्यांना तिरंगा झेंडा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजनाथ सिंह तिरंगा न घेता पुढे निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मोदी-अदानींची मुलाखतअदानी मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. संसदेसह बाहेरदेखील या मुद्द्यावरुन काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळत आहे. काल संसदेच्या आवारात दोघेजण नरेंद्र मोदी आणि गौतम अदानींचा चेहरा असलेले मुखवटे घालून आले. यावेळी राहुल गांधींनी त्यांची मुलाखत घेतली. हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.