Google ने प्ले स्टोअरवरून Paytm अॅप हटविले आहे. यामुळे डिजिटल भारताचा मोठा आधार असलेल्या पेटीएमला जोरदार धक्का बसला आहे. याचबरोबर करोडो युजरना पैशांचे काय होणार? पेटीएम बँक, पेटीएम वॉलेटवर असलेल्या पैशांचे काय होणार याची चिंता लागून राहिली आहे. यावर कंपनीने मोठी घोषणा केली आहे.
गुगलने म्हटल्यानुसार आम्ही ऑनलाइन कॅसिनो किंवा कोणत्याही नियमनाविरोधातील जुगार खेळांना समर्थन देत नाही. या ऍपच्या माध्यमातून बाहेरच्या वेबसाइटलाही पैशाच्या माध्यमातून जुगार खेळण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच जिंकणाऱ्याला पैसे/रोख बक्षिसे दिली जात असल्याचं गुगलनं आपल्या निवेदनात सांगितलं आहे. पेटीएम हे अॅप जरी हटविण्यात आले असले तरीही पेटीएम मॉल, पेटीएम फॉर बिजनेस, पेटीएम मनी अॅप आताही प्ले स्टोअरवर आहेत. तसेच अॅपल स्टोअरवरून पेटीएम डाऊनलोड करता येणार आहे. यामुळे चिंता केवळ अँड्रॉईड धारकांसाठीच आहे.
वारंवार उल्लंघन केल्याने कारवाईGoogleने पेटीएमला प्ले स्टोअरवरून हटवण्याची कल्पना डेव्हलपरला दिली होती. प्ले स्टोअरवर अॅप परत मिळविण्यासाठी पेटीएमच्या संपर्कात असल्याचंही गुगलनं सांगितलं आहे. पेटीएमची मालकी One97 Communications Limited या भारतीय कंपनीकडे आहे, त्याची स्थापना विजय शेखर शर्मा यांनी केली होती, पण चीनच्या अलिबाबा समूहाशी पेटीएमनं भागीदारी केली होती, त्यामुळे पेटीएमला फिन्टेक कंपनी अँड फायनान्शिएल्सकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला होता.