हेल्मेट नसल्याने ७७०० रुपयांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:55 AM2019-01-27T05:55:01+5:302019-01-27T05:55:37+5:30
सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्याच्या कारणावरुन एका युवकाला अडविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी किरकोळ कारणावरुन आकसपूर्ण कारवाई करत त्याला तब्बल ७७०० रुपये दंड केला.
नवी दिल्ली : सामान्य जनतेशी पोलिसांनी चांगले वर्तन करावे यासाठी हरियाणाचे पोलीस महासंचालक बी.एस. संधू यांनी संपूर्ण राज्यात ‘ऑपरेशन श्रीमान’सुरु केले आहे. मात्र सहप्रवाशाने हेल्मेट न घातल्याच्या कारणावरुन एका युवकाला अडविणाऱ्या वाहतूक पोलिसांनी किरकोळ कारणावरुन आकसपूर्ण कारवाई करत त्याला तब्बल ७७०० रुपये दंड केला.
गुरुग्राम सेक्टर-७ च्या देवीलाल कॉलनीत राहणाºया कमल याला १०० रुपयांऐवजी ७७ पट दंड करण्यात आला. कमल याने एकाला मुलास लिफ्ट दिली. त्या व्यक्तीने हेल्मेट परिधान केले नव्हते. कमल याने हेल्मेट घातले होते. त्याच्यावर कारवाई होत असताना कमल याने मोबाईल मधून व्हिडिओ चित्रण केले. त्यामुळे अन्य एका विना हेल्मेट दुचाकीस्वाराला जाऊ देत पोलिसांनी कमल याचा मोबाईल हिसकाविला. मोबाईल ‘फॉर्मेट’केला. ७७०० रुपये दंड केला. मोटारसायकलही जप्त केली. कमल बँकिंग क्षेत्रात काम करतो. गुरुवारी दुपारी तो फरीदाबादला येत होता. पालीजवळ त्याला एका किशोरवयीन मुलाने ‘लिफ्ट’मागितली. अनखीर-बडखल रस्त्यावर पोलिसांनी त्याला अडविले. खिशात पैसे नसल्याने कमल याने त्यांना दंड करु नये,अशी विनवणी केली. मात्र पोलिसांनी दंडाची पावती त्याच्या हातावर टिकविली.
योगायोगाने एक युवक विना हेल्मेट मोटरसायकलवर तेथे आला. दुसºया पोलीस कर्मचाºयाने त्याला दंड न करता जाऊ दिले. कमल याने या घटनेचा व्हिडिओ बनविला, आणि त्या युवकाला मोकळीक का दिली असा जाब विचारला. संतापलेल्या पोलिसांनी अवाजवी दंडासह लाइसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट याबद्दलही कारवाई केली. कमलकडे पैसे नसल्याने त्याला शहरात पायीच फिरावे लागले. एका मित्राकडून २०० रुपये घेऊन घरी जावे लागले. वाहतूक पोलीस उपायुक्त लोकेंद्र सिंह म्हणाले, पोलीस कर्मचाºयांची चूक असेल तर चौकशी केली जाईल.