नवी दिल्ली- हवामान बदल आणि तापमान वाढीचा धोका संपूर्ण पृथ्वीला असल्याचं आता जाणवत आहे. तापमानवृद्धीमुळे पयार्वरणाचा होत चाललेला नाश यामुळेही माणसाच्या समोर अऩेक संकटे उभी राहिली आहेत. जागतिक बँकेने तापमानवृद्धीचा भारताला मोठा फटका बसेल असे एका अभ्यासातून स्पष्ट केले आहे. 60 कोटी भारतीयांचे आयुष्य तापमानवाढीमुळे प्रभावित होणार आहे.2050 पर्यंत भारताचा जीडीपी 2.8 टक्क्यांनी घसरेल आणि भारताच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे राहणीमान हवामान बदलामुळे घसरेल. मध्य भारतातील जिल्हे विशेषतः विदर्भात तापमानात मोठी वृद्धी झाल्यामुळे तेथे अर्थकारण 10 टक्क्यांनी मंदावेल असे जागतिक बँकेने केलेल्या अभ्यासात नमूद केले आहे. गेल्या काही वर्षांपासून विदर्भ आणि तेलंगण तसेच मध्य भारतातील इतर जिल्ह्यांमध्ये तापमान अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने व्यक्त केलेली भीती काळजी करायला लावणारी आहे.
विदर्भाला सर्वात जास्त चटके, तापमानवाढीमुळे भारताचा जीडीपी घसरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 1:16 PM