जनतेला योगीमुक्त उत्तर प्रदेश हवाय; अर्थसंकल्पावरून अखिलेश यादव यांची टीका
By देवेश फडके | Published: February 22, 2021 04:34 PM2021-02-22T16:34:51+5:302021-02-22T16:36:59+5:30
उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे हे अखेरचे बजेट ठरेल, असा दावा यावेळी यादव यांनी केला आहे.
प्रयागराज :उत्तर प्रदेशचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकऱ्यांना मोफत पाणी, कामगारांना तासानुसार पैसे, अयोध्या विकासासाठी १४० कोटींची योजना, अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम विमानतळ, उद्योग तसेच महिला, तरुण आणि आयटी क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यावरून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर टीका केली असून, योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे हे अखेरचे बजेट ठरेल, असा दावा यावेळी यादव यांनी केला आहे. (akhilesh yadav criticized on yogi government over budget)
योगी सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. महागाई सातत्याने वाढत आहे. समाजवादी पक्षाने समाजातील प्रत्येक वर्गाला जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप सरकार केवळ भांडवलदारांसाठी काम करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला.
धोरण योग्य असेल, हेतू स्पष्ट असेल तर, नशीबही बदलतं: पंतप्रधान नरेंद्र मोदी
पेपरलेस नाही, योगीमुक्त उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशमधील जनतेला पेपरलेस अर्थसंकल्प नकोय, तर योगीमुक्त राज्य हवे आहे, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. समाजवादी पक्षाने केलेली जुनी कामे लोकांसमोर नव्याने मांडली. अर्थसंकल्प पूर्णपणे सादर केला नाही. जनतेपासून सत्य लपवले जात आहे, असा आरोपही अखिलेश यादव यांनी यावेळी बोलताना केला.
दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत उत्तर प्रदेश सरकारचा अर्थसंकल्प ३७ हजार ४१० कोटी रुपयांनी वाढला असल्याचे सांगितले जात आहे. पेपरलेस बजेटसाठी सर्व सदस्यांना टॅबलेट पुरवण्यात आले होते. योगी सरकारचे हे पाचवे बजेट असून, यामध्ये २७ हजार ५९८ कोटी रुपयांची तरतूद नव्या योजनांसाठी करण्यात आली आहे, असे समजते.