मोदी सरकारच्या बाजूने जनतेचा विश्वास दर्शक ठराव
By admin | Published: July 14, 2017 07:28 AM2017-07-14T07:28:04+5:302017-07-14T09:18:00+5:30
प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केली आहे.
ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 14 - कोणत्याही देशाच्या विकासासाठी जनतेचा सरकारवर विश्वास असणं महत्त्वाचं असतं. आर्थिक विकास, सरकारचे निर्णय व करासारख्या महत्त्वाच्या व्यवस्था प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारवर विश्वास असणं ही बाब महत्त्वाची ठरते. जनता सरकारला किती स्थिर आणि विश्वसनीय समजते यावर लोकांचा सरकारवर असलेल्या विश्वास विषद होत असतो. त्याप्रमाणेच देशाचं सरकार नागरिकांच्या सुरक्षेसाठी किती सक्षम आहे आणि जनतेला सुविधा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध असणंही गरजेचं असतं.
प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या ‘फोर्ब्स’ मॅगझिननं वेबसाइटवर एक यादी प्रसिद्ध केली आहे. जनतेला सरकारवर असलेल्या भरोशाच्या बाबतीत यादीमध्ये भारताला अव्वल स्थान देण्यात आलं आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये 15 देशांची नावं देण्यात आली आहे.
या यादीत भारताला पहिल्या क्रमांकाचं स्थान बहाल करण्यात आलं असून, ग्रीसला शेवटच्या स्थानी संधी मिळाली आहे. यादीनुसार भारताच्या सर्वाधिक 73 टक्के लोकांनी देशाच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. तर कॅनडातील 62 टक्के लोकांचा सरकारवर विश्वास आहे. कॅनडाला दुसरं स्थान मिळालं आहे. तुर्कस्थान आणि रशियाला यादीत तिस-या आणि चौथ्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशातील 58 टक्के लोकांनी सरकारवर भरोसा दाखवला आहे. युरोपिय देश जर्मनीत 55 टक्के, तर दक्षिण आफ्रिकेत 48 टक्के लोकांनी सरकारच्या कारभारावर समाधान व्यक्त केलं आहे. 45 टक्के लोकांनी भरोसा दाखवल्यामुळे ऑस्ट्रेलिया सातव्या स्थानी, तर 41 टक्के लोकांच्या विश्वासार्हतेमुळे ब्रिटेननं आठव्या स्थानी झेप घेतली आहे. जपानमध्ये फक्त 36 टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. विशेष म्हणजे लोकशाही मानणारा आणि जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेला यादीत दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.
आणखी वाचा
(2026 पर्यंत भारत सर्वांत मोठा दूध उत्पादक देश)
अमेरिकेत फक्त 30 टक्के लोकांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. स्पेननं 11व्या स्थानी, फ्रान्सनं 12व्या स्थानी जागा मिळवली आहे. ब्राझील, दक्षिण कोरिया आणि ग्रीसला क्रमशः 13व्या, 14व्या आणि 15व्या स्थानावर ठेवण्यात आलं आहे. ग्रीसमध्ये फक्त 13 टक्के लोकांनी सरकारवर भरोसा दाखवला आहे.
With 73 percent, India tops the Forbes list of countries with the most confidence/trust in their Government. pic.twitter.com/pZIWBMEk5I
— ANI (@ANI_news) July 13, 2017