पत्नीची हत्या करून फोटो फेसबुकवर; नराधम पती दोषी

By admin | Published: November 27, 2015 12:32 AM2015-11-27T00:32:41+5:302015-11-27T00:32:41+5:30

पत्नीची हत्या करून तिच्या रक्तबंबाळ मृतदेहाचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास बुधवारी दोषी ठरविण्यात आले.

Photo of murder by wife; Naradham husband guilty | पत्नीची हत्या करून फोटो फेसबुकवर; नराधम पती दोषी

पत्नीची हत्या करून फोटो फेसबुकवर; नराधम पती दोषी

Next

मियामी : पत्नीची हत्या करून तिच्या रक्तबंबाळ मृतदेहाचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करणाऱ्यास बुधवारी दोषी ठरविण्यात आले. डेरेक मेदिना असे या खुन्याचे नाव असून त्याला २५ वर्षे किं वा आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.
डेरेकने स्वसंरक्षणार्थ पत्नीवर आठ गोळ्या झाडल्या, असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला; मात्र ज्युरींना तो पटला नाही.
डेरेकने आॅगस्ट २०१३ मध्ये जेनिफर अल्फान्सो हिची मियामीतील आपल्या निवासस्थानी गोळ्या घालून हत्या केली होती. जेनिफरसोबत वाद सुरू असताना तिने चाकू दाखवून धमकावले. त्यामुळे आपण तिला गोळ्या घातल्या, असे डेरेकने पोलिसांना सांगितले.
अल्फान्सोने मला सोडून देण्याचा प्रयत्न केल्यास आपण तिला ठार मारू, असे मेदिनाने म्हटले होते. त्याचे पुरावे पोलिसांनी ज्युरींसमोर सादर केले. अल्फान्सो मेदिनाला सोडू इच्छित होती. तसे तिने तिच्या मित्रांना सांगितले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Photo of murder by wife; Naradham husband guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.