नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला असून, अनेक देशात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असला तरी मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओफारेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बॅरी ओफारेल म्हणाले, मोदी एक सुपर ह्यूमनसारखे आहेत. कोरोनाच्या महारोगराईशी त्यांनी ज्या पद्धतीनं लढा दिला तो वाखाणण्याजोगा आहे. पंतप्रधानांची अन्य नेत्यांशी संवाद साधण्याची कला प्रशंसनीय आहे- ऑस्ट्रेलियन राजदूतऑस्ट्रेलियन राजदूत म्हणाले, नरेंद्र मोदी हे लोकसंख्येमधील जगातील दुसर्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. जगाच्या इतर देशांच्या नेत्यांशी संपर्क साधण्यासाठी ते दररोज ज्या पद्धतीनं वेळ काढतात, ते कौतुकास्पद आहे. डीडी इंडियाचे वरिष्ठ सल्लागार संपादक रमेश रामचंद्रन यांनी ट्विटरवर एक छोटी व्हिडीओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. बॅरी ओफारेल यांची संपूर्ण मुलाखत सोमवारी रात्री 8 वाजता प्रसारित केली जाणार आहे.कोरोनाविरोधात ऑस्ट्रेलिया करतोय भारताला मदत- बॅरी ओफारेलबॅरी ओफारेल म्हणाले, "मोदींनी ऑस्ट्रेलियन पीएम मॉरिसन यांच्याशी कोरोनाबद्दल चर्चा केली आहे. त्यानंतर आम्ही कोरोनाविरोधात एकमेकांच्या मदतीनं संशोधनात सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी मला या संकट काळात ऑस्ट्रेलियामधील विद्यार्थ्यांसह संपूर्ण भारतीय समुदायाचे कल्याण करण्याचे आश्वासन दिले." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात कोरोना विषाणूची परिस्थिती आणि त्याला कसे रोखता येईल याबद्दल ऑस्ट्रेलियन समकक्ष स्कॉट मॉरिसन यांच्याशी बातचीत केली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"
Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ