मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 10:53 AM2018-04-15T10:53:48+5:302018-04-15T10:58:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत
जांगला (बिजापूर, छत्तीसगड) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत. मोदी यांचा हा चौथा छत्तीसगड दौरा ठरला आहे. या वर्षाच्या अखेरीस छत्तीसगडमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या आधी मे 2015 मध्ये त्यांनी दंतेवाडाला भेट दिली होती. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भाजपाच्या ट्विटर पेजलाही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
बिजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात आल्या. या प्रकारच्या योजनेंत तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात येणार आहेत, यामुळे जंगलात त्या आरामात चालू शकतील.
PM @narendramodi shows yet again why he is a 'Pradhan Sevak' in the true sense! #PMInBastarpic.twitter.com/YHi4qMDvfR
— BJP (@BJP4India) April 14, 2018
त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आयुष्यमान भारत योजनेच्या पहिल्या आरोग्य केंद्राचे जांगला येथे उद्घाटन केले. इतरही अनेक विकास कामांचे उद्घाटन, या वेळी मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग आणि आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची याप्रसंगी उपस्थिती होती. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत २०२२ पर्यंत देशात १.५ लाख आरोग्य केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
अन्य कामांचीही सुरुवात
बस्तर इंटरनेट योजनेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही मोदी त्यांच्या हस्ते झाले. त्याद्वारे आदिवासीबहुल सात जिल्ह्यांत ४० हजार किमी फायबर आॅप्टिकल केबल टाकून इंटरनेट जाळे निर्माण करण्यात येणार आहे. बिजापूर, नारायणपूर, बस्तर, कांकेर, कोंडगाव, सुकमा आणि दंतेवाडा यांचा त्यात समावेश आहे. त्यांनी रेल्वे मार्ग आणि गुडुम व भानुप्रतापपूर या दरम्यान धावणाºया रेल्वेचे उद्घाटनही केले. यामुळे बस्तर विभाग रेल्वेच्या नकाशावर आला आहे.