‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 03:57 PM2023-11-08T15:57:37+5:302023-11-08T15:58:47+5:30

Narendra Modi Nitish Kumar : मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महिलांच्या लैंगिक शिक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

PM Modi criticizes Nitish Kumar over his statement on women sex education | ‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका

‘अजून किती खालच्या पातळीवर जाणार, थोडी लाज बाळगा', PM मोदींची नितीश कुमारांवर टीका

Narendra Modi Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसंख्या नियंत्रणावर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मध्य प्रदेशमध्ये एका सभेला संबोधित करताना पीएम नरेंद्र मोदी, यांनीही नितीश कुमारांच्या लैंगिक शिक्षणावरील वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. 

संबंधित बातमी- नितीश कुमार 'कंट्रोल' तर आता RJD 'अनकंट्रोल', BJP ला घेरण्यासाठी केले अतिशय टोकाचे ट्विट

'india आघाडीचे नेते गप्प'
मध्य प्रदेशातील गुना येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पीएम म्हणाले की, 'विधानसभेत देशातील महिलांवर अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या नितीशकुमारांना लाज वाटली पाहिजे. अजून किती खालच्या पातळीवर जाणार आहात? नितीश कुमारांमुळे जगात देशाचे नाव खराब झाले. त्यांनी विधानसभेत देशातील माता-भगिनींचा अपमान केला. या मुद्द्यावर विरोधी आघाडीचे नेते गप्प का आहेत?' असा सवाल मोदींनी यावेळी विचारला.

 

'काँग्रेस काहीच करू शकत नाही'
आपल्या भाषणात पीएम मोदींनी काँग्रेसवरही हल्लाबोल करत म्हटले की, 'जे लोक स्त्रियांबद्दल असा विचार करतात, ते तुमच्यासाठी काहीच चांगले काम करू शकत नाहीत. माता-भगिनींच्या अशा भयंकर अपमानावर इंडिया आघाडीचा एकही नेता चकार शब्द बोलायला तयार नाही. भविष्याचा विचार करण्याची काँग्रेसमध्ये क्षमता नाही. ते आजच्या तरुणांसाठी किंवा भावी पिढ्यांसाठी काहीही करू शकत नाही.' 

संबंधित बातमी- "मी तर केवळ महिला शिक्षणासंदर्भात..."; 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर नितीश कुमारांनी जाहीर माफी मागितली!

'काँग्रेसला खोटं बोलण्याची सवय'
'काँग्रेससाठी देश आणि राज्याचा विकास महत्त्वाचा नाही, तर काँग्रेससाठी केवळ स्वतःचे हित महत्त्वाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली, पण गरिबी हटावचा नारा देत काँग्रेस गेली अनेक वर्षे तेच-तेच खोटं देशाला वारंवार सांगत आहे. काँग्रेसला गरिबी कधीच हटवता आली नाही, कारण काँग्रेस नेत्यांचे हेतू योग्य नव्हते. तिसर्‍यांदा माझा कार्यकाळ सुरू होईल, तेव्हा या देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या 3 मध्ये आणेन, हा मोदीचा शब्द आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले. 

'काँग्रेसचे नेते रिमोटवर चालतात'
यावेळी मोदींनी काँग्रेस नेतृत्वावरही टीका केली. '2014 पूर्वी देशाने काँग्रेसला 10 वर्षे संधी दिली होती. पण देशाचे पंतप्रधान काय करत आहेत. हे कोणालाच कळत नव्हते. कारण सर्व काही रिमोटने चालवले जात होते. आजही काँग्रेस रिमोट वापरण्याची सवय सोडत नाही. तेव्हा पंतप्रधान रिमोटवर काम करायचे, आता काँग्रेस अध्यक्ष रिमोटवर काम करतात. काँग्रेस अध्यक्ष हे सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत, पण ते केवळ नाममात्र आहेत. कधी ते सनातन धर्मावर बोलतात तर कधी विरोधात बोलतात, हे सगळं रिमोटवर चालतं,' अशी टीकाही मोदींनी यावेळी केली.  
 

Web Title: PM Modi criticizes Nitish Kumar over his statement on women sex education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.